अमिर खानला पडली ''बारामती'' ची भुरळ ; '' या '' साठी करायचाय तीन ते चार दिवस मुक्काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 05:00 PM2020-01-16T17:00:32+5:302020-01-16T17:08:14+5:30

गेल्या दोन तीन वर्षांपासुन याठिकाणी यावे, असे माझ्या मनात होते...

Baramati's Enchant to Aamir Khan; Want to stay for three to four days! | अमिर खानला पडली ''बारामती'' ची भुरळ ; '' या '' साठी करायचाय तीन ते चार दिवस मुक्काम!

अमिर खानला पडली ''बारामती'' ची भुरळ ; '' या '' साठी करायचाय तीन ते चार दिवस मुक्काम!

Next
ठळक मुद्देबारामतीत कृषक २०२० प्रदर्शनाच्या उदघाटनाच्यावेळी अभिनेते खान उपस्थितपाणी फाऊंडेशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग,पर्यावरण या विषयांवर संवाद

बारामती : अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातुन पवार कुटुंबियांनी केलेले काम खुप मोठे आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासुन याठिकाणी यावे, असे माझ्या मनात होते. येथे येवुन काहीतरी शिकण्याची माझी मनस्वी इच्छा होती. बारामती परिसरात करण्यात आलेले काम हा खुप मोठा विषय आहे. त्यासाठी मला येथे तीन चार दिवस मुक्काम हा विषय पूर्णपणे समजुन घ्यावा लागेल,अशा शब्दांत सिनेअभिनते अमीर खान यांनी देखील त्यांना बारामतीची भुरळ पडल्याची कबुली दिली.
बारामतीत कृषक २०२० प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेते खान उपस्थित होते. यावेळी खान यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातुन उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी खान म्हणाले,  पाणी हा मानवी जीवनातील महत्वाचा विषय आहे. शिक्षण हे खुप गरजेचे आहे. पाणी फाऊंडेशनच्या वतीने  आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग,पर्यावरण या विषयावर संवाद साधत आहोत. मी आज येथेबोलण्यासाठी नाहीतर शिकण्यासाठी आलो आहे. मात्र, एका दिवसात काहीच कळणार नाही.त्यासाठी तीन चार दिवस मुक्कामी यावे लागेल. शिक्षण आयुष्यावर महत्वाचा परीणाम करते,असे खान म्हणाले.
यावेळी खान म्हणाले, पाण्यापासुन सुरवात करण्याचा आम्ही निर्णय घेतला.महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याने याच ठिकाणापासुन आम्ही सुरूवात केली.पाणी फाउंडेशनच्या माध्यमातुन गेल्या चार वर्षांपासून आम्ही वॉटर मॅनेजमेंट शिकवत आहोत. गावातील लोकच हे काम करीत आहेत,आम्ही त्यांना केवळ शिकवत आहोत.पाण्याच्या नियोजनाबरोबर आम्ही जमिनीचे आरोग्य, गवत लागवडक्षेत्र निर्माण करणे,रीफॉरेस्ट्रेशन, पिक नियोजन,पाणी व्यवस्थापन या पाचविषयांवर पाणी फाउंडेशन काम करणार आहे.या विषयांच्या मुळाशी जाणार असल्याचे अभिनेते खान म्हणाले. यावेळी खान यांनी ग्रामीणशी संबंधित प्रश्नांवर सर्वच क्षेत्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अधिक अभ्यास आहे. त्यांच्याकडेच ग्रामीण समस्यांचे समाधान असल्याचे खान म्हणाले.
——————————————————

Web Title: Baramati's Enchant to Aamir Khan; Want to stay for three to four days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.