कमळाच्या रांगोळीने बारामतीकर बुचकळ्यात

By Admin | Updated: February 14, 2015 22:59 IST2015-02-14T22:59:10+5:302015-02-14T22:59:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झालेल्या व्यासपीठासमोर काढण्यात आलेल्या रांगोळीने बारामतीकरांचे विशेष लक्ष वेधले.

Baramatikar on the bungalow by the lotus rongoli | कमळाच्या रांगोळीने बारामतीकर बुचकळ्यात

कमळाच्या रांगोळीने बारामतीकर बुचकळ्यात

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झालेल्या व्यासपीठासमोर काढण्यात आलेल्या रांगोळीने बारामतीकरांचे विशेष लक्ष वेधले. मोदींनी केलेल्या भाषणाइतकीच या रांगोळीचीही चर्चा होती़ रांगोळीतील कमळाचे ‘चिन्ह’ सर्वांनाच बुचकळ्यात टाकत होते.
‘घड्याळाच्या दारात कमळाची रांगोळी’ असे वृत्त आज ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यामुळे सभास्थानची ही रांगोळी पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या रांगोळीत कमळाची तब्बल आठ फुले काढण्यात आली होती. विशेष म्हणजे भाजपाने चिन्ह म्हणून जे कमळ घेतले आहे त्या चिन्हाचीच प्रतिकृती होती. शरद पवार यांनी भगव्या राजकारणावर सतत टीका केली. पण आज हा भगवा रंग थेट बारामतीच्या माळावरील रांगोळीत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. (प्रतिनिधी)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित शेतकरी मेळाव्याच्या मंडपात काढलेल्या रांगोळीत फुललेले कमळ.

Web Title: Baramatikar on the bungalow by the lotus rongoli