शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बारामती वाचली, पण शरद पवारांच्या तिसऱ्या पिढीला मतदारांनी नाकारले

By अतुल कुलकर्णी | Updated: May 24, 2019 05:56 IST

लोकसभा निवडणुकीच्या आधीच; सरपंचापासून ते जिल्हा परिषदेपर्यंतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याजिल्ह्यातले नेटवर्क भाजपने पद्धतशीरपणे मोडून काढले.

- अतुल कुलकर्णीलोकसभा निवडणुकीच्या आधीच; सरपंचापासून ते जिल्हा परिषदेपर्यंतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याजिल्ह्यातले नेटवर्क भाजपने पद्धतशीरपणे मोडून काढले. त्या जागी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी कसे निवडून येतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. निवडून येणाऱ्यांना ताकदही दिली. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र त्याच त्या पारंपारिक निवडणूक पध्दतीवर भर देत सगळा प्रचार केला. भाजपने सोशल मिडीयाचा केलेला वापर राष्ट्रवादीला कळालाच नाही. एकीकडे स्वत:ला सेक्यूलर म्हणून घेत असताना दुसरीकडे मुस्लिम आणि दलित मते आपल्याकडे कशी वळतील याकडेच राष्ट्रवादीने सगळे लक्ष केंद्रीत केले त्यामुळे एकदिलाने काम करुनही या पक्षाला पराभव पहाण्याची वेळ आली.भाकरी फिरवली पाहिजे हा विचार मांडणाºया शरद पवार यांनी स्वत: हा विचार कृतीत आणला नाही. मुलगी बारामतीतून, नातू मावळमधून आणि स्वत: माढ्यातून उभे रहणार अशी भूमिका त्यांनी घेतली. आपला पक्ष म्हणजे आपल्या पलिकडे काहीच नाही असा संदेश त्यातून गेला. नंतर त्यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असे सांगितले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.आपण आता सत्तेत नाहीत, विरोधकाची भूमिका आपल्याला बजावली पाहिजे हे या पक्षातल्या अनेक नेत्यांना शेवटपर्यंत कळाले नाही. हल्लाबोल यात्रा काढताना तरुण वर्ग आपल्यासोबत येताना दिसत नाही याचेही आकलन वेळीच या पक्षातल्या धुरिणांना झाले नाही. तरुण वर्ग धनंजय मुंडे सोबत जेवढा जोडला जातो तो अन्य नेत्यांसोबत का जात नाही हे ही पक्षनेतृत्वाला उमजले नाही. त्यातून संधी दिली ती देखील घरातल्याच तरुण नातवाला. नाही म्हणायला अमोल कोल्हे या तरुण अभिनेत्यास संधी दिली पण कोल्हे यांचे यश त्यांचे स्वत:चे अधिक होते. त्यात पक्षाचा वाटा कमी होते. भ्रष्टाचाराचे आरोप असणाºया छगन भूजबळ, अजित पवार यांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वास बसत नव्हता. ज्यांच्या बोलण्यावर विश्वास वाटत होता, व ज्यांची पाटी कोरी होती त्यांच्या नेतृत्वावर पक्षातल्याच अन्य नेत्यांचा विश्वास नव्हता. यामुळे स्वत:च्याच कोंडीत राष्टÑवादीचे नेते सापडले. जे मतदार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडेच पुन्हा पुन्हा जात, नवे लोक न जोडताच प्रचार करण्याचे काम केले परिणामी अपयश आले.>पराभवाकडे दुर्लक्ष करुन दुष्काळी भागात मदतीसाठी जाऊ..!आमचा ११ जागांचा अंदाज होता. आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. कष्ट घेतले आहेत. त्यामुळे आम्ही व आमचे कार्यकर्ते पराभवाकडे दुर्लक्ष करून आगामी निवडणुकीच्या कामाला लागत आहोत. ज्या जागा आम्ही गमावल्या त्या कमी फरकाने गमावल्या आहेत. या पराभवाचा विचार नक्की करू. राज्यात दुष्काळ भीषण आहे. संकटग्रस्त लोकांना मदत करणार आहे. दुष्काळासंबंधी जो कार्यक्रम हाती घेतला आहे तो तसाच सुरु ठेवणार. - शरद पवार>तीन ठिकाणी विजयराष्ट्रवादी पक्षाने एकूण १९ जागा लढवल्या. त्यातल्या १० जागा भाजपाच्या तर ९ जागा शिवसेनेच्या विरोधात राष्टÑवादीने लढल्या. त्यातील ३ ठिकाणी त्यांनी भाजपला हरवण्याचे काम केले.पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीवरुन घातलेला घोळ, शरद पवार यांनी आधी लढणार, नंतर नाही लढणार अशी संभ्रमावस्था निवडणुका जाहीर झाल्यावर तयार केली त्याचाही फटका राष्टÑवादीला बसला.बारामती, सातारा, कोल्हापूर आणि माढा या चार जागा २०१४ साली राष्टÑवादीने जिंकल्या होत्या. त्यापैकी बारामती व सातारा त्यांना राखता आल्या पण कोल्हापूर व माढा मात्र गमवाव्या लागल्या.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९