बारामतीला मुक्तता हवी - मोदी

By Admin | Updated: October 10, 2014 05:41 IST2014-10-10T05:41:25+5:302014-10-10T05:41:25+5:30

बारामतीच्या जनतेला काका-पुतण्यापासून स्वातंत्र्य हवे आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळात नेहमीच १० वाजलेले असतात.

Baramati needs freedom - Modi | बारामतीला मुक्तता हवी - मोदी

बारामतीला मुक्तता हवी - मोदी

बारामती : बारामतीच्या जनतेला काका-पुतण्यापासून स्वातंत्र्य हवे आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळात नेहमीच १० वाजलेले असतात. त्यांचे निवडणूक चिन्ह म्हणजे, १० वर्षांमध्ये केलेल्या दहा पट भ्रष्टाचाराचे प्रतीक असून बारामतीला आता गुलामगिरीपासून मुक्तता हवी आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले.
भाजप आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळोची उपबाजार मैदानात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. बारामतीच्या ४० गावांना पाण्याची टंचाई नेहमी भासते. उजनी धरणातील पाणी प्रदूषित आहे. अशा वेळी सार्वजनिक जीवनात अशिष्ट वक्तव्ये करणारे नेते मंत्री म्हणून मिरवतात, अशा वेळी शरमेने मान खाली जाते, असा टोमणाही मोदी यांनी अजित पवार यांना मारला.
सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या जवानांना नैराश्य येईल, असे वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शरम वाटली पाहिजे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी आज येथील जाहीर सभेत केली.

Web Title: Baramati needs freedom - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.