बारामती - Vijay Shivtare on Baramati ( Marathi News ) गोष्टी घडत असतात, विसरायच्या असतात, मतभेद झाले हरकत नाही, मनभेद नको. गावागावात ८०-९० टक्के मतदान सुनेत्रा पवारांच्या घड्याळ चिन्हावर झालं पाहिजे. मोदींना झालं पाहिजे. बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असेल. पुरंदरची जनता मोठ्या प्रमाणात लीड सुनेत्रा पवारांना देतील हा शब्द विजय शिवतारेंनी सासवडच्या महायुतीच्या मेळाव्यात दिला.
विजय शिवतारे म्हणाले की, बारामतीपेक्षा जास्त लीड पुरंदरमधून मिळालं पाहिजे. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालं असून आम्ही प्रचंड ताकदीने दौरे एकत्रित करत, लोकांना समजावत अजित पवारांना १९९१ साली बारामतीपेक्षा जास्त लीड दिले होते. त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला यंदाच्या निवडणुकीत करायची आहे. बारामतीत समसमान मते होतील, पण पुरंदरमध्ये बारामतीपेक्षा जास्त लीड आम्ही देऊ असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत १ वर्षाच्या आत गुंजवणीचं पाणी पुरंदरला आलं पाहिजे. तिजोरी अजितदादांच्या हाती आहे. आमची दुश्मनी लोकांनी पाहिली आता दोस्तीही बघा, विमानतळ जमीन अधिग्रहणासाठी स्वेच्छा खरेदी दर द्या. समृद्धी महामार्गाच्या निर्माणावेळी एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री म्हणून जी किमया केली. ३ महिन्यात ७७१ एकर जमीन अधिग्रहण केली तशीच आता करावी असं विजय शिवतारेंनी म्हटलं.
दरम्यान, मी लढत होतो, तेव्हा मला सपोर्ट करणारे होते. परंतु मी जेव्हा थांबलो तेव्हा माझ्याविरोधात बोलले. मला खोक्यांची गरज नाही. गावागावातून ज्यापद्धतीने संपूर्ण लोक पेटून उठले होते, पुरंदर एक झाला होता. जेव्हा मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यानंतर संघर्ष करून जे मिळणार होते, तहात मिळाले. जे तुम्ही मला सांगितले तेच पुरंदर, सासवडच्या जनतेला सांगावं यासाठी हा मेळावा घेतला. माझा अजितदादांवर प्रचंड राग होता. बोलता बोलता अनेकदा चुका होता. प्रचंड रोष दादा होता, बापू आम्ही ऐकणार नाही, नोटाला मतदान करू पण इतर ठिकाणी नाही असं जनता बोलत होती. तरीही तुम्ही इथं येऊन शब्द स्वाभिमानी जनतेला द्यावा. त्यातून सकारात्मक लाट येईल असंही शिवतारेंनी म्हटलं.