शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 14:13 IST

AiIt Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरुन अजित पवार यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

Baramati Loksabha Election : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा नणंद भावजयीमध्ये बारामती लोकसभा मतदारासंघात होत असलेल्या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पवार कुटुंबियांमध्ये होत असलेल्या या लढतीसाठी प्रचार, बैठका, सभा यांना बारामतीमध्ये वेग आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सुप्रिया सुळेंना वारंवार लक्ष्य केलं जात आहे. मी केलेल्या कामाचं श्रेय सुप्रिया सुळे घेत असल्याचे म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांनी बहिणीवर टीका केली आहे.

मी केलेली कामे सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली असा आरोप अजित पवार यांनी केला. आंबेगावमध्ये भोर, वेल्हे आणि मुळशी येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी आंबेगाव परिसरात एमआयडीसी आणण्याचं आश्वासन देखील अजित पवारांनी दिलं.

काय म्हणाले अजित पवार?

"मला काही जण दाखवत होते की, दादा तुम्हीच केलेली काम आताच्या खासदारांनी पुस्तिकेत छापली. माझीच कामे अर्धी त्यामध्ये दाखवली. बारामतीमधल्या सगळ्या इमारती  मी बांधल्या पण फोटो मात्र दाखवून मी केलं मी केलं असं सांगितलं.  मित्रांनो ते केलं आहे तर भोरमध्ये काय केलं ते सांगा?  भोर, वेल्ह्यात काहीच केलं नाही आणि नुस्ती भाषणं. मी सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषणं करीन पण त्यामुळे याचं पोट भरणार आहे का? काहीतरी कृती करण्यासाठी प्रशासानावर तुमची पकड असायला हवी, अशी खोचक टीका अजित पवारांनी केली.

सुनेत्रा पवार काही लाखांनी जिंकणार - अजित पवार

" मी ज्या ज्या वेळी निवडणुकांमध्ये उतरतो, माझा आत्मविश्वास असतो म्हणूनच मी निवडणुकांमध्ये उतरतो. मी निवडणुकांमध्ये हरण्यासाठी कधीच उतरत नाही, जिंकण्यासाठीच उतरत असतो आणि या निवडणुकीतही मी काही लाखांनी जिंकणारच आहे," असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४barabanki-pcबाराबंकीAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेMaharashtraमहाराष्ट्र