शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

बारामती लोकसभेची लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी; देवेंद्र फडणवीसांचा एल्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 20:52 IST

Loksabha Election 2024: महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे वसुली सरकार अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख केला

शैलेश काटे

इंदापूर - Devendra Fadnavis in Baramati ( Marathi News

बारामती लोकसभा निवडणूक शरद पवारविरुद्ध अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी अशी आहे. त्यामुळे बारामतीचा खासदार नरेंद्र मोदी यांच्या विकासयात्रेमध्ये चालेल की राहुल गांधी यांच्या समाजविरोधी व देशाच्या विकासाचा अजेंडा नेस्तनाबूत झाला पाहिजे अशा मानसिकतेच्या मागे चालेल याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.५) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या मतदारसंघात कोणी ही निवडून आले तरी देशात फार मोठा बदल घडणार आहे असे नाही. परंतु देशात बदल घडवणार्‍यांना कोण साथ देवू शकते याची ही खरी लढाई आहे. महायुतीचा उमेदवार निवडून आला तर मोदींच्या प्रत्येक विकासाच्या कार्याला एक हात वर असेल. दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी परिवर्तनाचे जे जे निर्णय घेतले. त्या प्रत्येक निर्णयाला खा. सुप्रिया सुळे यांनी विरोध केला. अगदी काश्मीरचे ३७० कलम हटवण्याचा विधेयकास देखील त्यांनी विरोध केला. ही निवडणूक पुढे वेगवेगळ्या भावनिक मुद्यांवर जाईल, असे भाकीत त्यांनी वर्तवले.

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वतःच्या भरवशावर क्रांती करता येवू शकेल असा विश्वास निर्माण होईल इतपत तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासह इंदापूर तालुक्याचे पालकत्व स्वीकारण्यासाठी आपण आलो आहोत, असे सांगून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मिळालेल्या ताकदीचा उपयोग, इंदापूर तालुक्याकरिता व हर्षवर्धन पाटील यांना ताकद देण्याकरिता कसा करता येईल हे केल्याशिवाय आपण रहाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. या वेळी हर्षवर्धन पाटील यांचे भाषण झाले. पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी जिल्ह्यातील भाजपच्या कामाचा आढावा देताना कार्यकर्त्यांची भावना स्पष्ट केली. भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांचे भाषण झाले.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे वसुली सरकार अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख करत, एकमेकांच्या विरोधात लढलेल्या लोकांनी केवळ खुर्चीकरिता युती केल्याची टीका फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीत सहभागी होण्याच्या कृतीची भलावण करताना, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना स्थापनेच्या उद्देशाला काळीमा फासण्याचे काम चालले होते.केवळ पुत्राकरिता निर्णय घेतले जात होते म्हणून सहका-यासमवेत बाहेर पडण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. तर राज्य व देशाचा विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही असा अजित पवार व त्यांच्या सहका-यांचा विचार होता. संघटीतपणे मोदींची ताकद वाढवण्यासाठी अजित पवार यांना महायुतीत सहभागी करुन घेतले असा दावा फडणवीस यांनी केला

टॅग्स :baramati-pcबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४