बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला की पौर्णिमेला?
By Admin | Updated: September 3, 2014 02:41 IST2014-09-03T02:41:22+5:302014-09-03T02:41:22+5:30
वाजत-गाजत बाप्पा घरोघरी विराजमान झाले खरे; परंतु बाप्पाच्या विसर्जनाबाबत भक्त संभ्रमात आहेत. 8 सप्टेंबरवा अनंत चतुर्दशीला विसर्जन होईल.

बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला की पौर्णिमेला?
नाशिक : वाजत-गाजत बाप्पा घरोघरी विराजमान झाले खरे; परंतु बाप्पाच्या विसर्जनाबाबत भक्त संभ्रमात आहेत. 8 सप्टेंबरवा अनंत चतुर्दशीला विसर्जन होईल. परंतु त्याचदिवशी सकाळी 1क् वाजून 48 मिनिटांनी प्रोष्ठपदी पौर्णिमा लागत असल्याने विसर्जन नेमके सकाळी की दुपारनंतर करायचे, याबाबत गोंधळ आहे.
8 सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेला प्रारंभ होत होईल. 9 सप्टेंबरला सकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होईल. त्यामुळे अनंत चतुर्दशी सकाळी 1क् वाजून 48 मिनिटांर्पयतच असल्याने त्या कालावधीच्या आत विसर्जन करावे लागेल. दुस:या दिवशी महालयारंभ अर्थात पितृपक्षास प्रारंभ होत असल्याने श्रद्धकाळात गणोशविसर्जन होऊ शकत नाही. परिणामी,
नेमके विसर्जन कधी आणि केव्हा करावे, यासारखे प्रश्न भाविकांच्या मनात आहेत. 8 सप्टेंबरला नेहमीप्रमाणो केव्हाही गणोशविसर्जन करावे, असा खुलासा पंचागकर्ते मोहन दाते यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
8 सप्टेंबरला सकाळी 1क्.48 वाजता पौर्णिमेस प्रारंभ होऊन दुस:या दिवशी सकाळी 7.क्7 वाजता समाप्तीकाळ आहे. त्यानंतर पितृपक्षास प्रारंभ होत आहे. जे कुटुंब आपल्या पूर्वजांचे श्रद्ध दरवर्षी पौर्णिमेला घालत असतील त्यांना 8 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशीच पौर्णिमेचे श्रद्धकर्म पार पाडावे लागणार आहे. याबाबत खुलासा करताना यांनी पंचागकर्ते मोहन दाते सांगितले, पौर्णिमेचे श्रद्ध चतुदर्शीच्या दिवशीच घालावे लागेल. परंतु पौर्णिमेचा महालय सप्टेंबरमधील 13, 16, 17, 2क् आणि 23 या कोणत्याही तारखांना करता येईल.