बाप्पा.. पुढच्या वर्षी लवकर या!
By Admin | Updated: September 10, 2016 02:44 IST2016-09-10T02:44:50+5:302016-09-10T02:44:50+5:30
तालुक्यातील पाच दिवसीय गणपती बाप्पाचे विसर्जन गणपती बाप्पा मोरया, गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हालाच्या गजरात उत्साहात पार पडले.

बाप्पा.. पुढच्या वर्षी लवकर या!
पालघर : तालुक्यातील पाच दिवसीय गणपती बाप्पाचे विसर्जन गणपती बाप्पा मोरया, गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हालाच्या गजरात उत्साहात पार पडले. डिजे चा आवाज न्यायालयाच्या आदेशान्वये ७० डेसिबलपर्यंत खाली आल्याने अनेक सार्वजनिक मंडळांनी डिजे ऐवजी बेंजो पार्टीला पसंती दिल्याने बेंजोचे भाव वधारले होते. या दरम्यान अनेक कुटुंबीयांनी टाळ मृदृंगाच्या आवाजात गणपती बाप्पाला निरोप दिला.
पालघर उपविभागातील पालघर, मनोर, सफाळे, सातपाटी, केळवे पोलीस स्टेशन अंतर्गत खाजगी २२८ तर सार्वजनिक ६७९ गणपती बाप्पाच्या मर्ू्त्यांचे, वसई उपविभागाच्या वसई, माणकिपूर, नालासोपारा, तुळींज, वालीव, विरार,अर्नाळा येथील खाजगी १८४, तर सार्वजनिक ४ हजार ६८२ मूर्त्यांचे विसर्जन, बोईसर उपविभागाच्या बोईसर, तारापूर, वाणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत खाजगी २६४ तर सार्वजनिक १०६ मूर्त्यांचे विसर्जन, डहाणू, तलासरी, घोलवड येथील सार्वजनिक ११८ तर खाजगी १८९ मूर्त्यांचे विसर्जन तर जव्हार, मोखाडा, विक्रमगड, कासा, वाडा, पोलीस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक १७० तर खाजगी ४५७ मूर्त्यांचे विसर्जन शुक्रवारी करण्यात आले. (प्रतिनिधी)
>डीजेमुक्त गणेश विसर्जन करणाऱ्या मंडळास हजाराचे बक्षीस
तलासरी : तलासरी परिसरातील गणेश उत्सव मंडळांनी आपल्या गणेश मुर्तीचे विसर्जन डीजे मुक्त केल्यास त्या मंडळास तलासरी येथील मसाला व्यापारी माशालकर यांनी एक हजार रु पयाचे बक्षीस घोषित केले आहे.
>१६ भाज्या रानभांज्याचा नैवेद्य
विक्रमगड : वाडा, विक्रमगड व जव्हार परिसरात शुक्रवारी मोठया उत्साहात गौरीचा यथासांग पाहुणचार करण्यात आला. व गौरीला प्रिय असा १६ भाज्या रानभांज्याच्या नैवेद्याबरोबरच महिलांनी डोक्यावर घेऊन आलेला सुपामधील ओसा गौरीमातेला अर्पण केला आहे.
ओसा म्हणजे खास करुन एका सुपामध्ये नवविवाहीत महिला व इतर महिला राणभाज्या त्यामध्ये काकडी, वेगवेगळी फळे, राणफुल,े साडी, ब्लाऊज पीस, ओटी नारळ आदिंंचा भरना असतो. हे सारे देवीला अर्पण केले जाते.
गणपतीपाठोपाठ गुरुवारी गौराईचे माहेरी मोठयÞा उत्साहात आगमन झाले. गौराईला नटवणे, सजवणे, तिचे आगमन साजरे करणे, याचा सोहळाही सर्वत्र साजरा झाला. विविध ज्ञातींमध्ये गौरीच्या पूजनाच्या पद्धती वेगळ्या आहेत. तिच्या सजवण्यातही पारंपरिक पद्धती आहेत. नैवेद्यातही खासियत आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्र मगड तालुक्यात कोळी, आगरी, कुणबी, आदिवासी या मूळ जमाती आपले संस्कृतीचे वेगळेपण जपून आहेत. मात्र, या सर्व परंपरा वेगळ्या जरी असल्या तरी त्यातील श्रद्धाभाव सारखाच असतो.
>विक्रमगडमध्ये पावसाचे विरजण...
विक्रमगड : गणपतीबाप्पामोरया, पुढच्या वर्षीलवकर या अशी आळवणी करीत गणेश भक्तांनी पाच दिवसाच्या गणेश मूर्तींना शुक्रवारी निरोप दिला.मात्र सकाळ पासुन पाऊस पडत असल्याने व सायंकाळीही पावसाचे वातावण असल्याने गणपती बाप्पांचीमूर्ती घेऊन थेट मिरणुकीविनाच विसर्जनाचे ठिकाण गाठले. त्यामुळे रात्री उशिरापर्यत विसर्जन सुरु राहाणार आहे. तालुक्यातील विविध विसर्जन घाटांवर (नदी, ओव्हळ) सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यांत आले. यंदा मात्र दीडदिवसांच्या गणेश मूर्तीपेक्षा ५ दिवसांच्या गणेशमूर्तींची संख्या खुपच कमी होती. कारण उदया काही गणपती गौरीसोबत विसर्जन केले जाणार असल्यानेही संख्या कमी होती.दरम्यान, निरोप देतांना गणेश भक्त भावूक झाले होते. त्यातच पावसाने विसर्जनच्या वेळीच पावसाचे वातावण असल्याने भक्त बाप्पांच्या भक्तीमय वातारणात गुंफला होता. सायंकाळी ५ ते ६ वाजता गणपतीची विधिवतपूजा-आरती करुन श्रीचेविसर्जन करण्यात आले. विसर्जना आधी हातगाडी, टेम्पो, रिक्षा, कार, टॅक्टरमध्ये मूर्ती ठेवून वाजतगाजत, गुलाल उधळत त्यांची मिरवणूक काढण्यांत आली होती. परंतु यावर पावसाने विरजन फिरले, विक्रमगड शहरातील,गणेश मुर्तींचे गडदे येथील तांबानदीवर विसर्जन करण्यांत आले. पोलिस निरिक्षक विजय शिंदे यांनी आपल्या पोलीस पथकासह सर्वत्र फिरुन विसर्जनस्थळांची पाहाणी केली. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य यांनीही विसर्जनास्थळी विषेश काळजी घेतली.
पारंपरिक भजन गात बाप्पाला निरोप : वसई तालुक्यात पाच दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ग्रामीण भागात गणरायाचे नदी, नाला, तळे या पाण्याच्या ठिकाणी पारंपारीक भजने गात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. वसई पूर्व भागात अनेक गावामधे गणेशघाट व इतर विसर्जनासाच्या सुख सुविधा नसल्यामुळे विसर्जनाठी भक्तांची गैरसोय झाली होती.