बापट यांच्या अहवालाचे गडकरींच्या हस्ते उद्या प्रकाशन
By Admin | Updated: August 16, 2014 23:35 IST2014-08-16T23:35:42+5:302014-08-16T23:35:42+5:30
‘कमलदूत बोल अनुभवाचे; ध्येय विकासाचे’ या अहवालाचे प्रकाशन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी 18 ऑगस्ट रोजी होणार आह़े

बापट यांच्या अहवालाचे गडकरींच्या हस्ते उद्या प्रकाशन
>पुणो : गेल्या 5 वर्षाच्या काळात कसबा मतदारसंघात झालेल्या विकासकामांवर आधारित ‘कमलदूत बोल अनुभवाचे; ध्येय विकासाचे’ या अहवालाचे प्रकाशन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी 18 ऑगस्ट रोजी होणार आह़े
बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी साडेपाचला होणा:या या कार्यक्रमाला खासदार गजानन कीर्तिकर यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती आमदार गिरीश बापट यांनी दिली़
या उद्देशानेच हा अहवाल तयार केला आह़े या कार्यक्रमाला खासदार अनिल शिरोळे, आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, भीमराव तापकीर, शिवसेना शहरप्रमुख अजय भोसले, शयाम देशपांडे, भाजपाचे राष्ट्रीय चिटणीस श्याम जाजू, प्रदेश चिटणीस योगेश गोगावले, रिपाइंचे युवा अध्यक्ष परशुराम वाडेकर, रिपाइंचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्यासह कसबा मतदारसंघातील नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत़
या वेळी शहर चिटणीस संदीप खर्डेकर उपस्थित होत़े (प्रतिनिधी)
4अगदी नगरसेवक असल्यापासून आपल्या कामाचा अहवाल गेली 32 वर्षे अहवाल देणारा मी एकमेव आमदार आह़े कसबा मतदारसंघाचे नेतृत्व करताना या भागात झालेली विकासकामे, विधायक उपक्रम, आगामी काळातील संकल्प आदी जनतेर्पयत पोहोचविणो आवश्यक आहे, असे बापट म्हणाले.