या आठवड्यात तीन दिवसच सुरु राहणार बँका
By Admin | Updated: February 19, 2017 11:18 IST2017-02-19T11:18:48+5:302017-02-19T11:18:48+5:30
चालू आठवड्यात म्हणजेच 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2017 दरम्यान बँकांना 4 दिवस सुट्टी आहे.

या आठवड्यात तीन दिवसच सुरु राहणार बँका
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - चालू आठवड्यात म्हणजेच 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2017 दरम्यान बँकांना 4 दिवस सुट्टी आहे. त्यामुळे बँका फक्त तीन दिवसच सुरु असतील. तुमची जर बँकेची काही कामे असतील तर ती या तीन दिवसात करावी लागतील. मुंबई आणि महाराष्ट्रात मतदानासाठी मंगळवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस बँका सुरु राहतील.
त्यानंतर शुक्रवार महाशिवरात्री असल्याने बँक बंद त्यासोबतच चौथा शनिवार आल्याने ती सुट्टी आणि रविवार. अशी सलग 3 दिवस बँकेला सुट्टी असणार आहे. त्या या पुढील आठवड्यात तुमची बँकेची काही कामे असतील तर ती सोमवारी, बुधवार आणि गुरुवारीच आटोपून घ्या.