बँक व्यवस्थापकाला बच्चू कडूंची मारहाण
By Admin | Updated: September 16, 2014 02:36 IST2014-09-16T02:36:24+5:302014-09-16T02:36:24+5:30
अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत आ. बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकांच्या श्रीमुखात भडकावली.

बँक व्यवस्थापकाला बच्चू कडूंची मारहाण
अचलपूर (जि़ अमरावती) : परतवाडय़ातील अंध मुलांचे कर्ज प्रकरण प्रलंबित ठेवून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत आ. बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकांच्या श्रीमुखात भडकावली. या प्रकरणी अचलपूर पोलिसांनी आमदारासह बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंद केला.
मनोज मौदेकर (55), असे शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे. मौदेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी 11 वाजता बँकेत अनोळखी व्यक्ती आली आणि तिने आ. बच्चू कडू यांच्याशी मोबाईलवरून कजर्प्रकरणाविषयी बोलणो करून दिले. त्यावेळी कडू यांनी ‘आपण कजर्प्रकरण मंजूर का करीत नाही’ अशी विचारणा आपल्याकडे केली. त्यावर कजर्प्रकरणाबाबत आपणास माहिती नाही, असे उत्तर दिले. यावर कडू संतापले आणि त्यांनी बँकेत येऊन मारहाण केल्याचे मौदेकर यांनी तक्रारीत म्हटले आह़े परतवाडा पोलिसांनी याप्रकरणी आ. बच्चू कडू यांच्याविरूध्द भादंवि कलम 353, 5क्6 अन्वये गुन्हा नोंदविला. तर पंजाब नॅशनल बँकेत कजर्प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी गेले असता तेथील व्यवस्थापकाने धमकावून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार विक्रमसिंग मोहनसिंग बावरी यांनी परतवाडा पोलिसांत दिली
आहे. (प्रतिनिधी)
सीसीटीव्ही फूटेज.
बच्चू कडू व त्यांच्या सहका:यांनी सोमवारी बँक व्यवस्थापक मनोज मौदेकर यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रसंग बँकेतील सीसीटीव्ही कॅमे:यामध्ये कैद झाल्याचे सूत्रंनी सांगितले.