बँक-कर्ज घोटाळा; मास्टरमाइंडला ईडीने ठोकल्या बेड्या
By Admin | Updated: May 4, 2017 05:13 IST2017-05-04T05:13:27+5:302017-05-04T05:13:27+5:30
बँक कर्ज घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी झूम डेव्हलपर्स कंपनीचा मुख्य संचालक विजय चौधरी

बँक-कर्ज घोटाळा; मास्टरमाइंडला ईडीने ठोकल्या बेड्या
मुंबई : बँक कर्ज घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी झूम डेव्हलपर्स कंपनीचा मुख्य संचालक विजय चौधरी याला मुंबईतून अटक केली. त्याच्या कंपनीने मुंबईसह
देश-विदेशातील तब्बल २५ बँकांना २ हजार ६५० कोटींचा चुना लावल्याचा आरोप आहे.
चौधरी हा अंधेरीत असलेल्या झूम डेव्हलपर्सचा प्रवर्तक आणि मुख्य संचालक आहे. ही कंपनी मुंबई आणि इंदूरमध्ये काम करते. चौधरी आणि त्याच्या कंपनीच्या अन्य संचालक आणि कर्मचाऱ्यांनी युरोपियन बँकांकडून २ हजार ६५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तथापि, कर्जाची रक्कम घेऊन त्याने पलायन केले. या प्रकरणी ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्याने या रकमेतून अमेरिकेतील कॅलिफोर्नियात १२८० एकर जमीन विकत घेतली. जुलै २०१५मध्ये ईडीने या जमिनीवरही जप्ती आणली होती. या प्रकरणात झूम डेव्हलपर्स या कंपनीचा एक संचालक शरद काब्रा याला अटक केली. तो सध्या कारागृहात आहे. विजय चौधरी मात्र पसार झाला होता. अखेर मंगळवारी रात्री तो मुंबईत आल्याची माहिती ईडीला मिळाली. त्यानुसार
ईडीने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. (प्रतिनिधी)