बँक संप तूर्त टळला
By Admin | Updated: January 20, 2015 02:36 IST2015-01-20T02:36:58+5:302015-01-20T02:36:58+5:30
देशभरातील ८ लाख बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा २१ ते २४ जानेवारी असा ४ दिवसांचा नियोजित संप तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.

बँक संप तूर्त टळला
मुंबई : वेतनवाढीच्या प्रश्नावर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निश्चितपणे तोडगा काढण्याचे आश्वासन इंडियन बँक्स असोसिएशनने (आयबीए) दिल्याने देशभरातील ८ लाख बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा २१ ते २४ जानेवारी असा ४ दिवसांचा नियोजित संप तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या ८ देशव्यापी संघटनांच्या संयुक्त कृती समितीचे प्रतिनिधी व आयबीए यांच्यात सोमवारी मुंबईत वाटाघाटींच्या २ फेऱ्या झाल्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, आगामी वाटाघाटींत तोडगा न निघाल्यास फेबु्रवारीत संपाच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.