शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तब्बल १० लाख शेतकºयांची बँक खाती बनावट -  चंद्रकांत पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:23 IST

कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतक-यांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केला.

कोल्हापूर : कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतक-यांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केला.पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, कर्जमाफीसाठी शेतक-यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ८९ लाख शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो पण आतापर्यंत ७२ लाख अर्ज आॅनलाईन दाखल झाले आहेत. जो खरा शेतकरी आहे तोच अर्ज भरत असून इतर मंडळींच्या मनात शंका असल्याने ते अर्ज भरण्यापासून लांब राहिले आहेत. ही आकडेवारी पाहता राज्यात सुमारे १० लाख शेतक-यांची खाती बनावट असल्याचे स्पष्ट होते. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (दि. १५)पर्यंत मुदत असून त्यानंतर पंधरा दिवसांत नेमलेली समिती अभ्यास करणार आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यास अजूनही काही ठिकाणी अडचणी येत आहेत, त्या लवकरच दूर करून शेतक-यांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले जातील.कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दसरा मेळाव्यासाठी आपण उपस्थित राहणार का, यावर ‘सदाभाऊंचे काम चांगले आहे आणि आपण चांगल्या कामाची नेहमी स्तुती करतो. त्यांना भाजपमध्ये का घेतले नाही, याबाबत आपण आताच काही बोलणार नाही’ असे त्यांनी सांगितले.‘देवस्थान’च्या जमिनी कुळांनाच देणारदेवस्थान समितीच्या जमिनीची मालकी कुळाकडे असल्याने त्यातून समितीला फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या जमिनी संबंधित कुळांनाच रेडिरेकनर दराने देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे. या जमिनींवरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढून टाकणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी