आरोपीचे बँक खाते गोठवले!

By Admin | Updated: December 30, 2014 01:20 IST2014-12-30T01:20:30+5:302014-12-30T01:20:30+5:30

एक कोटी रुपयांच्या रकमेबाबत तपास करण्याचे निर्देश पाथर्डी न्यायालयाने पोलिसांना दिले़ तसेच संबंधित बँक खाते गोठवण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले़

The bank account of the accused has been frozen! | आरोपीचे बँक खाते गोठवले!

आरोपीचे बँक खाते गोठवले!

पाथर्डी (जि. अहमदनगर) : जवखेडा दलित हत्याकांडातील फिर्यादीच आरोपी निघाल्याने शासकीय आर्थिक मदत, विविध राजकीय व्यक्ती आणि हितचिंतकांकडून सहानुभूतिपोटी मिळालेल्या जवळपास एक कोटी रुपयांच्या रकमेबाबत तपास करण्याचे निर्देश पाथर्डी न्यायालयाने पोलिसांना दिले़ तसेच संबंधित बँक खाते गोठवण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले़ दरम्यान, आरोपी दिलीप जाधव याला १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली.
जवखेडे खालसा येथे संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री व
मुलगा सुनील यांचा २० आॅक्टोबरच्या मध्यरात्री धारदार शस्त्राने खून करण्यात आला. या गुन्ह्यात
प्रशांत जाधव, त्याचा भाऊ
अशोक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तिसरा आरोपी दिलीप जाधवला अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते़
या वेळी न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले. या गुन्ह्यात आरोपी निष्पन्न नसताना अ‍ॅट्रॉसिटीचे कलम का लावण्यात आले? सेक्शन ३४ उशिरा का लावले? अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावल्याने पीडितांच्या नातेवाइकांना सहानुभूतिपोटी जवळपास १ कोटी रुपयांची रक्कम मिळालेली आहे़ पोलिसांनी ही रक्कम ताब्यात
घेऊन ती ताब्यात घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले
आहेत. (प्रतिनिधी)

च्न्यायालयाने पोलिसांच्या तपासाबाबत खडसावल्यानंतर पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीचे कलम वगळावे, असा अर्ज न्यायालयाकडे दिला आहे.

च्हत्याकांड हे कौटुंबिक वादातून घडले असून, मारेकरी हे मृतांचे जवळचे नातेवाईक आहेत. चौघांनीच संगनमताने हे हत्याकांड घडवून आणल्याने या गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावण्याची गरज नाही, असे निष्पन्न झाल्यानेच सदरचा अर्ज पोलिसांनी न्यायालयाकडे दिल्याची माहिती आहे.

फक्त चारच आरोपी!
जवखेडे हत्या प्रकरणात केवळ चारच आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती आहे. त्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अटक करणे बाकी आहे. चौथा आरोपी ही महिला असल्याचे समजले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले करवत, कुऱ्हाड ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. एक-दोन दिवसांत चौथा आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.

Web Title: The bank account of the accused has been frozen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.