बांग्लादेशी तीन मुलींची कुंटणखान्यातून सुटका
By Admin | Updated: January 19, 2017 05:22 IST2017-01-19T05:22:02+5:302017-01-19T05:22:02+5:30
कुंटणखान्यात विक्री केल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बुधवार पेठेत छापा टाकला.

बांग्लादेशी तीन मुलींची कुंटणखान्यातून सुटका
पुणे : बांग्लादेशच्या अल्पवयीन मुलीची कुंटणखान्यात विक्री केल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बुधवार पेठेत छापा टाकला. सराफ वाड्यातील घरामधून तीन मुलींची सुटका करण्यात आली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुंटनखाना चालिकेला अटक करण्यात आली आहे.
सिमला सैला तमांग (वय ५१, रा. ९९२, बुधवार पेठ, सराफ वाडा. मूळ रा. नेपाळ) असे अटक महिलेचे नाव आहे. पोलिसांनी जमुना नेपाली, अल्पवयीन मुलीची विक्री करणारे यामीन आणि सपना यांच्याविरूध्दही गुन्हा दाखल केला आहे. आरोपी यामीन आणि सपना यांनी सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला बांग्लादेशातून फुस लावून भारतात आणले होते. तिची बुधवार पेठेमध्ये ६० हजार रूपयांना विक्री करण्यात आली होती. (प्रतिनिधी)