‘बांगलादेशी आरोपींचा अतिरेक्यांशी संबंध नाही’
By Admin | Updated: August 1, 2016 04:37 IST2016-08-01T04:37:40+5:302016-08-01T04:37:40+5:30
जोगेश्वरीमधून तीन बांगलादेशींना शनिवारी मेघवाडी पोलिसांनी अटक केली. या तिघांचाही अतिरेक्यांशी संबंध नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘बांगलादेशी आरोपींचा अतिरेक्यांशी संबंध नाही’
मुंबई : जोगेश्वरीमधून तीन बांगलादेशींना शनिवारी मेघवाडी पोलिसांनी अटक केली. या तिघांचाही अतिरेक्यांशी संबंध नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींचा अतिरेकी संघटनेशी काही संबंध असल्याचे चौकशीत सिद्ध झालेले नाही. मोहम्मद मुबारक मुस्तफा शेख (२७), हाबीबूल रहमान अब्दुल हलीम शेख (३०) आणि निजामुद्दीन कुर्बान अली शेख (३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, ते मेघवाडी परिसरात टोप्या आणि अत्तर विक्री करून उदरनिर्वाह चालवत होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने, रोजगाराच्या शोधात ते भारतात आले, असे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितल्याची माहिती अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या दोघांना स्थानिक न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचेही त्यांनी नमूद केले. या तिघांचे कुटुंब बांगलादेशातच असल्याचेही ते म्हणाले. तिघांची अधिक चौकशी सुरू आहे.