बंगळुरू स्फोटांशी पुणो स्फोटांचे कनेक्शन!

By Admin | Updated: July 13, 2014 01:40 IST2014-07-13T01:40:56+5:302014-07-13T01:40:56+5:30

फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाचे बंगळुरू येथे 17 एप्रिल 2013 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांशी कमालीचे साम्य आहे.

Bangalore explosions connection with Pune explosives! | बंगळुरू स्फोटांशी पुणो स्फोटांचे कनेक्शन!

बंगळुरू स्फोटांशी पुणो स्फोटांचे कनेक्शन!

पुणो : दगडुशेठ मंदिरापासून अगदी जवळ फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाचे बंगळुरू येथे 17 एप्रिल 2013 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांशी कमालीचे साम्य आहे. तसेच बंगळुरूसह चेन्नई आणि पुणो स्फोटांत वापरलेल्या बॉम्बचा ‘मेक’ सारखाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांचा त्या दृष्टीने तपास सुरू झाला आहे. 

सातारा न्यायालयाच्या आवारामधून दादासाहेब रासगे या पोलिसाची मोटारसायकल चोरुन तिचा वापर स्फोटासाठी करण्यात आला. दगडुशेठ मंदिर आणि पोलीस हे दोन्ही ‘टार्गेट’ एकाच वेळेला दहशतवाद्यांनी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर भाजपाचे शहर कार्यालय असण्याची शक्यता तपास यंत्रणांमधून व्यक्त होत आहे. 
17 एप्रिल 2क्13 रोजी बंगळुरुतील मल्लेश्वरम भागामध्ये असलेल्या जगन्नाथ भवन इमारतीमधील भाजपा कार्यालयाजवळ दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. दोन मोटारींच्या मधोमध मोटारसायकल लावून स्फोट घडविण्यात आला होता. यात वापरलेली मोटारसायकल हैदराबादमधून चोरण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. तिच्यामध्ये जवळपास अर्धा किलो स्फोटके लावण्यात आलेली होती. विशेषत: त्यामध्ये अमोनियम नायट्रेट पावडरचा वापर करण्यात आलेला होता. 
फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोटामध्येही याच पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याचे समोर आले आहे. बंगळुरू स्फोटांमध्ये 8 पोलीस कर्मचारी आणि 8 नागरिक जखमी झाले होते. तर फरासखाना स्फोटामध्येही पोलीस आणि नागरिक हे संयुक्त लक्ष्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बंगळुरूमध्ये बॉम्बस्फोट घडविणा:या संघटनेनेच पुण्यातला स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे.  (प्रतिनिधी)
 
सिमी कार्यकत्र्याकडे चौकशी
च्एटीएसने शहरातील सिमीच्या सक्रिय कार्यकत्र्याकडे कसून चौकशीला सुरुवात केली आहे. यासोबतच कडव्या जिहादी गटांशी संबंधित असलेल्या संशयितांकडेही चौकशी सुरु करण्यात आली आहे. एटीएसला उपलब्ध झालेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन दहशतवाद्यांची छबी कैद झाली आहे. 
च्या दोघांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एटीएसची काही पथके गुजरात, कर्नाटक आणि हैदराबादकडे तपासासाठी रवाना झाली आहेत. स्फोटामध्ये जिहादी गटांचा हात असल्याबाबत तपास यंत्रणांचे एकमत झाले असून, इंडियन मुजाहिदीनसह अन्य संघटनांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.  
 
रॅकेट  ‘स्कॅनर’खाली
पुणो आणि पिंपरी-चिंचवड भागामध्ये सिमीचे 4क् पेक्षा अधिक कार्यकर्ते सक्रिय आहेत. त्यांच्यावर यंत्रणांनी लक्ष्य केंद्रित केले असून, त्यांचे मोबाइल रेकॉर्ड्स, ई-मेल चॅटिंग तपासण्याचे काम सुरु आहे. यासोबतच दहशतवादी कारवायांसाठी येणारा पैसा हा हवालामार्फत आणला जातो. त्यामुळे शहरातील हवाला रॅकेट चालवणारेही यंत्रणांच्या स्कॅनरखाली आहेत.

Web Title: Bangalore explosions connection with Pune explosives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.