प्लास्टिकच्या झेंड्यांवर बंदी आणा -हायकोर्ट
By Admin | Updated: March 31, 2015 04:03 IST2015-03-31T04:03:57+5:302015-03-31T04:03:57+5:30
महाराष्ट्रात प्लास्टिकच्या झेंड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणा व यासाठी ठोस धोरण आखा, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिले़

प्लास्टिकच्या झेंड्यांवर बंदी आणा -हायकोर्ट
मुंबई : महाराष्ट्रात प्लास्टिकच्या झेंड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणा व यासाठी ठोस धोरण आखा, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिले़
न्या़ नरेश पाटील यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ मुळात प्लास्टिकच्या झेंड्यांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करायला हवी़ शालेय पुस्तकांतून याची माहिती देणे आवश्यक आहे़ प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनाचा सोहळा झाल्यानंतर रस्त्यावर पडलेले झेंडे उचलण्याची जबाबदारी महापालिकेच्या वार्ड आॅफिसरवर टाकायला हवी, असे मतही न्यायालयाने या वेळी व्यक्त केले़ याप्रकरणी हिंदू जनजागृती संघाने जनहित याचिका केली आहे़ प्लास्टिकच्या झेंड्यांवर बंदी आणावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे़ या बंदीसंदर्भातील एक प्रस्ताव प्रलंबित असल्याचे केंद्र सरकारने गेल्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले़ अखेर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने वरील आदेश दिले़ येत्या गुरुवारी यावरील पुढील सुनावणी होणार आहे़ (प्रतिनिधी)