ठाणे : प्रजासत्ताकदिनी प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा १९७१ नुसार कारवाई होते. (प्रतिनिधी)
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी
By admin | Updated: January 24, 2017 05:47 IST