शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्रातील फटाक्यांवरील बंदी अखेर मागे; विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 07:00 IST

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर कुंटे यांनीही गमे यांच्याशी चर्चा केल्यानंतर तिढा सुटला आहे. 

नाशिक : ऐन दिवाळीच्या तोंडावर फटाके विक्री आणि फटाके वाजवण्यास मनाई करण्याचा आदेश अखेर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मागे घेतला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर कुंटे यांनीही गमे यांच्याशी चर्चा केल्यानंतर तिढा सुटला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडून मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अथवा आदेश प्राप्त झालेले नाहीत. तर आपण केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित केले होते, असे गमे यांनी माध्यमांना सांगितले. वसुंधरा योजनेअंतर्गत नाशिक विभागाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले असून, त्या अनुषंगानेच राधाकृष्ण गमे यांनी दिवाळी काळात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी फटाके विक्री आणि फटाके वाजविण्यास बंदी घालण्यासाठी प्रयत्न केले. फटाक्यासारखा हंगामी व्यापार करणाऱ्यांनीही फटाक्यांची अगोदरच खरेदी करून ठेवली असल्याने त्यांची अडचण झाली होती. मंगळवारी फटाके विक्रेत्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना नाशिक दौऱ्यात निवेदन दिले होते. अर्थात, गमे यांनी सूचित केले होते, सर्वस्वी निर्णय जिल्हाधिकारी, महापालिका आणि नगरपालिकांनीच घ्यायचा होता. नाशिक महापालिकेने मात्र फटाके बंदी करण्यास नकार दिला आहे. 

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीChhagan Bhujbalछगन भुजबळ