महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी - राष्ट्रपतींनी केली प्रस्तावावर स्वाक्षरी

By Admin | Updated: March 2, 2015 17:33 IST2015-03-02T17:33:50+5:302015-03-02T17:33:50+5:30

महाराष्ट्रामध्ये गोवंशहत्या बंदीच्या प्रस्तावावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून गेली १९ वर्षे प्रलंबित असलेली ही मागणी भाजपाचे केंद्रात व राज्यात सरकार आल्यावर पूर्ण झाली

Ban on cow slaughter in Maharashtra - sign of offer by President | महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी - राष्ट्रपतींनी केली प्रस्तावावर स्वाक्षरी

महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी - राष्ट्रपतींनी केली प्रस्तावावर स्वाक्षरी

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - महाराष्ट्रामध्ये गोवंशहत्या बंदीच्या प्रस्तावावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून गेली १९ वर्षे प्रलंबित असलेली ही मागणी भाजपाचे केंद्रात व राज्यात सरकार आल्यावर पूर्ण झाली आहे. राष्ट्रपतींच्या या प्रस्तावावरील स्वाक्षरीमुळे महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदीचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे.  ३० जानेवारी १९९६ रोजी असा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता. य प्रस्तावाचा शेतक-यांवर तसेच कृषिक्षे६ावर काय परिणाम होईल याबाबत अभ्यास करण्यात आला आणि त्याचेही सविस्तर सादरीकरण किरीट सोमय्या यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांनी केले होते. केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आलो पाठोपाठ राज्यातही भाजपाचे सरकार आले त्यानंतर राज्यातल्या भाजपा नेत्यांनी हा मुद्दा पुन्हा हातात घेतला आमि राष्ट्रपतींकडे पाठपुरावा केला. अखेर आज सोमवारी राष्ट्रपतींनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याचे वृत्त असून त्यामुळे महाराष्ट्रात गोवंशहत्येला बंदी घालण्याचा म्रग मोकळा झाला आहे.

Web Title: Ban on cow slaughter in Maharashtra - sign of offer by President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.