चंद्रपुरात बांबू संशोधन केंद्र, वन अकादमी

By Admin | Updated: November 28, 2014 01:49 IST2014-11-28T01:49:23+5:302014-11-28T01:49:23+5:30

बांबूची शास्त्रोक्त लागवड आणि त्याच्या औद्योगिक वापरासाठी प्रशिक्षण देण्यास चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापनेचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

Bamboo Research Center, Forest Academy, Chandrapur | चंद्रपुरात बांबू संशोधन केंद्र, वन अकादमी

चंद्रपुरात बांबू संशोधन केंद्र, वन अकादमी

मुंबई : बांबूची शास्त्रोक्त लागवड आणि त्याच्या औद्योगिक वापरासाठी प्रशिक्षण देण्यास चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापनेचा निर्णय मंत्रिमंडळाने  घेतला. नवीन बांबू धोरण लवकरच जाहीर करण्यात येत असून त्यांतर्गत या केंद्रातून प्रशिक्षण दिले जाईल. चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढवून त्यास वन अकादमीमध्ये रूपांतरित करण्याचा  निर्णयही या वेळी घेण्यात आला. 
चिचपल्लीच्या संशोधन केंद्रात बांबूवर आधारित डायरेक्टर जनरल ऑफ एप्लॉयमेंट अँड ट्रेनिंग या केंद्र सरकारच्या विभागामार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्र म सुरू करण्यात येईल. या प्रशिक्षण केंद्राकरिता संचालक व अन्य 22 पदांची निर्मिती करण्यास आणि इतर खर्चापोटी 11 कोटी 12 लाख रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. 
चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचे नाव आता ‘चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी’ असे करण्यात येईल. त्यामार्फत वन्यजीव व्यवस्थापन आणि वानिकी उत्पादनविषयक प्रशिक्षण देण्यात येईल.  तसेच या अकादमीला शासनातर्फे 1क्क् टक्के अनुदान देण्यात येईल.  (विशेष प्रतिनिधी)
 
सामाजिक वनीकरणाचे विलीनीकरण
च्सामाजिक वनीकरण व वन विभागाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सामाजिक वनीकरण संचालनालय आता वन विभागात समाविष्ट होईल. हे संचालनालय सध्या ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्नणाखाली असेल. तथापि, सामाजिक वनीकरण संचालनालयाचे अस्तित्व स्वतंत्र ठेवून ते संचालक सामाजिक वनीकरण यांच्या नियंत्रणाखाली येईल. तसेच मंत्रलयातील सामाजिक वनीकरण विभाग हा प्रधान सचिव (वने) यांच्या नियंत्नणाखाली येईल. संचालनालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वन विभागात समाविष्ट करण्यात येतील. 
 
बुरु ड बांधवांना
स्वामित्वात सूट
नवीन बुरुडांची नोंदणी करणो तसेच या कामगारांना स्वयंरोजगारासाठी  प्रोत्साहन मिळावे म्हणून स्वामित्व 
शुल्क न आकारता बांबूचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 

Web Title: Bamboo Research Center, Forest Academy, Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.