...म्हणे केंद्रात प्रबोधनासाठी ठेवल्या मतपत्रिका
By Admin | Updated: February 21, 2017 14:20 IST2017-02-21T14:20:58+5:302017-02-21T14:20:58+5:30
एका राजकिय उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये भलतीच शक्कल शोधून काढली.

...म्हणे केंद्रात प्रबोधनासाठी ठेवल्या मतपत्रिका
नाशिक : एका राजकिय उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये भलतीच शक्कल शोधून काढली. काय तर म्हणे नागरिकांचा गोंधळ उडतो म्हणून प्रबोधनासाठी थेट मतदान केंद्रातच मतपत्रिका नेवून ठेवल्या. विशेष म्हणजे ज्या केंद्रावर हा प्रकार घडला त्या केंद्राधिकाऱ्यांनी देखील यास आक्षेप घेतला नाही. गंगापूररोडसारख्या उच्चभ्रू वसाहतीमधील अभिनव बाल मंदीर शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर सदर प्रकार दस्तुरखुद्द महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या निदर्शनास आला. कृष्ण हे मुख्य निवडणूक अधिकारी असून त्यांनी यास आक्षेप घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघडणी करत मतपत्रिका बाहेर नेण्यास सांगितले.