बलीप्रतिपदादिनी ‘चटणी-भाकर’ आंदोलन
By Admin | Updated: October 31, 2016 16:58 IST2016-10-31T16:58:48+5:302016-10-31T16:58:48+5:30
सोयाबीनला पाहिजे तो भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतक-यांच्यावतिने बलीप्रतिपदादिनी ३१ आॅक्टोंबर रोजी जुन्या बसस्थानकाजवळ सकाळी ११ वाजता ‘चटणी-भाकर’ आंदोलन करुन आपला रोष व्यक्त केला.

बलीप्रतिपदादिनी ‘चटणी-भाकर’ आंदोलन
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 31- सोयाबीनला पाहिजे तो भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतक-यांच्यावतिने बलीप्रतिपदादिनी ३१ आॅक्टोंबर रोजी जुन्या बसस्थानकाजवळ सकाळी ११ वाजता ‘चटणी-भाकर’ आंदोलन करुन आपला रोष व्यक्त केला.
शेतक-यांनी रात्रंदिवस मेहनत करुन सोयाबीनचे उत्पादन घेतले. उत्पादन निघाल्यानंतर बाजारातील भाव पडले. सोयाबीनला योग्य भाव दयावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतक-यांनी येथील जुन्या बसस्थानकावर आगळे वेगळे चटणी भाकर आंदोलन करुन शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांना पार्सलव्दारे कुटाराचे पोते भेट म्हणून पाठविण्यात येणार आहे. यावेळी दामोदर इंगोले, गजानन बोराचाटे, रोहीत माने, गजानन देशमुख, राजु इंगोले, विजय शेंडगे, मदन लादे, अशोक जाधव, अंकुश शिंदे, शरद कोरडे, शुभम नवघरे, अरविंद पाटील यांच्यासह स्वाभामानी शेतकरी संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी यांची उपस्थिती होती.