२००७ पासून बाळासाहेबांची दैनंदिन तपासणी होत होती
By Admin | Updated: April 22, 2015 04:07 IST2015-04-22T04:07:49+5:302015-04-22T04:07:49+5:30
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव्हेंबर-डिसेंबर २००७ पासून दररोज वैद्यकीय तपासणी केली जात होती, अशी माहिती डॉ़ जलील

२००७ पासून बाळासाहेबांची दैनंदिन तपासणी होत होती
मुंबई: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव्हेंबर-डिसेंबर २००७ पासून दररोज वैद्यकीय तपासणी केली जात होती, अशी माहिती डॉ़ जलील परकार यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात दिली़
बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरून उद्धव व जयदेव ठाकरे यांच्यात वाद झाल्याने याची सुनावणी सध्या न्या़ गौतम पटेल यांच्यासमोर सुरू आहे़ बाळासाहेबांनी मृृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली तेव्हा डॉ़ परकार हेही उपस्थित होते़ त्यामुळे त्यांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली़ बाळासाहेब सभा प्रचारासाठी घराबाहेर पडताना त्यांच्यासोबत लिलावतीतील डॉक्टरांचे पथक बाळासाहेबांसोबत असायचे़ एका दसऱ्या मेळाव्यालाही मी बाळासाहेबांसोबत होतो, असे डॉ़ परकार यांनी न्यायालयाला सांगितले़ बाळासाहेब दिवसाला दोन ते तीन पेग वाईन घेत होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले़ पुढील सुनावणी बुधवारी होईल़ (प्रतिनिधी)