शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
2
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
5
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
6
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
7
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
8
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
9
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
10
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
11
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्
12
प्रज्वल रेवन्ना भारतात येणार, बंगळुरूसाठी फ्लाइट तिकीट बुक!
13
"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग
14
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
15
थरार: गाढ झोपलेल्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
16
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
17
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
18
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
19
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
20
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या

राज-उद्धव यांनी एकत्र यावे, ही बाळासाहेबांची शेवटची इच्छा; नितीन गडकरींचा गौप्यस्फोट...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 9:14 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनपेक्षित घटना घडल्या आहेत. वर्षभरापूर्वी राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे युतीचे सरकार स्थापन झाले होते. एका वर्षापासून हे सरकार सुरळीत सुरू होते, पण अचानक एक मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. या सर्व घडामोडीदरम्यान, मुंबईत अनेक ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याचे आवाहन करणारे बॅनर झळकत आहेत. यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठा दावा केला आहे.

झी मराठीवर अवधुत गुप्ते 'खुपते तिथे गुप्ते' शो घेऊन आले आहेत. या शोमध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हजेरी लावली. येत्या 9 तारखेला हा भाग रिलीज होणार आहे. या भागाचे काही प्रोमो समोर येत आहेत, अशाच एका प्रोमोमध्ये नितीन गडकरी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  (Balasaheb Thackeray) यांची शेवटची इच्छा बोलून अपूर्ण राहिल्याचे सांगितले. 

बाळासाहेबांची इच्छा अपूर्ण...

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, बाळासाहेबांचे माझ्यावर आणि माझे बाळासाहेबांवर खूप प्रेम होते. बाळासाहेब त्यांच्या अखेरच्या दिवसांत होते, तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होतो. त्यावेळेस त्यांनी सर्वांना बाहेर जायलं सांगितलं आणि मला एकट्यात शेवटची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी मला राज आणि उद्दव यांना एकत्र करण्यास सांगितले. राजकारण एका बाजुला, पण एक कुटुंब म्हणून एकत्र असल्यावर ताकत वाढत असते. बाळासाहेबांची ती इच्छा अद्याप अपूर्ण राहिली आहे, असा गौप्यस्फोट गडकरींनी केला.  

राज्यातील परिस्थितीवर भाष्ययाच कार्यक्रमात नितीन गडकरींनी राज्यातील परिस्थितीवरही भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा ही खरेतर देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे. वैचारिक मतभेद असतील पण मनभेद नव्हते. मी 18 वर्षे विधिमंडळात होतो, कठोर टीका करायचो पण व्यक्तिगत मैत्री होती. थोडेसे आता जास्त झाल्यासारखे वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य माणसाला याचा कंटाळा आलाय. याला खरे कारण नेत्यांपेक्षा मीडियाच कारणीभूत आहे. 

मतदारांना दिला मोलाचा सल्ला

या देशात विचारभिन्नता ही समस्या नाही तर विचारशून्यता समस्या आहे. तुम्ही कुठल्याही पक्षाच्या विचाराचे असाल, कम्युनिस्ट असाल, समाजवादी असाल पण तुम्ही विचारांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. मूळात याला मतदार जबाबदार आहे. जसं मुलीसाठी नवरा बघता, सासू-सासरे कसे आहेत. घर कसे आहेत याचा विचार करता मग मत देताना का गांभीर्याने विचार करत नाही. हा माझ्या जातीचा, हा माझ्या भाषेचा म्हणून मतदान करता. ज्यादिवशी जनता ठरवेल की, आम्ही देणारे मत विचारपूर्वक देऊ. बिल्कुल चुकीच्या माणसाला देणार नाही. त्यादिवशी राजकारणात आपोआप बदल होतील, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना