बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले - उध्दव ठाकरे

By Admin | Updated: May 16, 2014 16:11 IST2014-05-16T16:11:28+5:302014-05-16T16:11:28+5:30

काँग्रेसमूक्त भारत हे बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न आज साकार झाले असल्याचे भावनिक उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांनी काढले.

Balasaheb's dream came true - Uddhav Thackeray | बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले - उध्दव ठाकरे

बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले - उध्दव ठाकरे

>ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १६ - काँग्रेसमूक्त भारत हे बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न आज साकार झाले असल्याचे भावनिक उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांनी काढले. 
राज्यात शिवसेनेला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल उध्दव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात जावून मतदारांचे आभार मानले. शिवसेना विरूध्द नारायण राणे असा सामना नेहमीच राहिला आहे. राणे यांचे पूत्र निलेश राणे यांच्या अटीतटीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. या लढतीत निलेश राणे यांचा दणदणीत पराभव झाल्याने कोकणात शिवसेनेचा विजय झाला आहे. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेण्याऐवजी कोकणात जावून पत्रकारांशी संवाद साधला. कोकण जनतेचे विशेष आभार मानीत मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे आश्वासन उदधव ठाकरे यांनी यावेळी दिले. 

Web Title: Balasaheb's dream came true - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.