बाळासाहेब जनतेच्या भल्यासाठी झटणारे नेते होते - मोदी
By Admin | Updated: November 17, 2015 11:27 IST2015-11-17T10:37:22+5:302015-11-17T11:27:28+5:30
बाळासाहेब ठाकरे हे जनतेच्या भल्यासाठी झटणारे नेते होते असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.

बाळासाहेब जनतेच्या भल्यासाठी झटणारे नेते होते - मोदी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - बाळासाहेब ठाकरे हे जनतेच्या भल्यासाठी झटणारे नेते होते असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तृतीय स्मृतीदिन असून यानिमित्त शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरव्दारे बाळासाहेब ठाकरे यांना आंदरांजली वाहिली. बाळासाहेबांना कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच आदराचे स्थान होते असेही मोदींनी म्हटले आहे. दरम्यान, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कमध्ये कार्यकर्त्यांची संभाव्य गर्दी बघता दादरमधील वाहतुकीच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.