शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब थोरातांचा लेटरबॉम्ब, हायकमांडला पाठवलेल्या पत्रात म्हणाले, "असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 09:24 IST

Balasaheb Thorat: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली असली तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या सत्यजित तांबेंवरून पक्षात धमासान माजलेले आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली असली तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या सत्यजित तांबेंवरून पक्षात धमासान माजलेले आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत सत्यजित तांबे यांनी बाजी मारली होती. या विजयानंतर सत्यजित तांबे यांनी पक्षातील राजकारणावरून नाना पटोलेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनीही लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्र काँग्रेसच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. 

सत्यजित तांबेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबेंवरून जे राजकारण झालं, व्यथित करणारं असल्याचं म्हटलं आहे. तसेच नाना पटोलेंसोबत काम करणं अशक्य झालंय, असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील, असा सूचक इशाराही बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रामधून दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, राज्यात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारण झालं. या निवडणुकीत सत्यजित चांगल्या मताने विजयी झाला. त्याचं आम्ही अभिनंदन करतो. मात्र या निवडणुकीत जे राजकारण झालं ते मला व्यथित करणारं आहे. त्याबाबतच्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

विधानसभेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र तिथून त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला होता. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSatyajit Tambeसत्यजित तांबेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस