शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांना उद्धवनेच छळले; राणेंचा हल्लाबोल

By admin | Updated: July 19, 2014 02:54 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनीच सर्वाधिक छळले. त्यांनी जर आपल्याविरोधात टीका करणे थांबविले नाही

रत्नागिरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनीच सर्वाधिक छळले. त्यांनी जर आपल्याविरोधात टीका करणे थांबविले नाही, तर ‘मातोश्री’च्या आतील सगळ्या गोष्टी बाहेर आणेन, असा इशारा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला. कोकण दौऱ्यावर आलेल्या राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझी मनधरणी करण्यास गुरुवारी रात्री प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व कृपाशंकर सिंह आले होते. मात्र राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे सचिव वाल्मीकी यांचाही फोन आला. त्यांनाही तेच सांगितले. काँग्रेस नेत्यांनी दिलेला शब्द कधीच पाळला नाही. अपमानित केले. मात्र आता आपली ताकद दाखवूनच देऊ, असा इशारा त्यांनी दिला. ‘बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना सेनेत प्रवेश नाही,’ असे उद्धव म्हणाले होते. यावर राणे म्हणाले, बाळासाहेबांचा सर्वाधिक छळ उद्धवनेच केला. हे तुम्ही ‘मातोश्री’वरील नोकर, शिवसेनेचे जुने नेते व ‘मातोश्री’च्या भिंतींनाही विचारा. दोनवेळा हा माणूस घर सोडून गेला व मुलाबाळांसह हॉटेल हॉलिडे इनमध्ये राहिला होता. ते छळणेच होते.