शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
4
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
5
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
6
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
7
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
8
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
9
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
10
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
11
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
12
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
13
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
14
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
15
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
16
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
17
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
18
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
19
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
20
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांनीही घेतली होती 'अशीच' भूमिका; राज ठाकरेंचा मोदीविरोध पटवण्यासाठी मनसेची शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 11:51 IST

लोकसभा निवडणूक न लढवण्याचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा निर्णय योग्य आहे हे पटवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी भूतकाळात घेतलेल्या अशा निर्णयांचा आधार घेतला आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रास सत्तेवर असणाऱ्या भाजपासरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी  मनसे यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या या निर्णयावरून उटल सुटल चर्चांना सुरुवात झाली. मात्र लोकसभा निवडणूक न लढवण्याचा मनसेचा निर्णय योग्य आहे हे पटवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी भूतकाळात घेतलेल्या अशा निर्णयांचा आधार घेतला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निर्णयामधील साम्य शोधणारी व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निवडणूक लढवली नाही याचा अर्थ तलवार म्यान केली, असा होत नाही तर भविष्यातील मोठ्या लढाईसाठी तलवार परजली जात आहे. असा दावा  या व्हिडिओ क्लिपमधून मनसेकडून केला जात आहे. सुरुवातीच्या काळात कट्टर विरोधकांना पराभूत करण्यासाठी बाळासाहेबांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्याचा फायदा काँग्रेसच्या एका गटाला झाला होता. मात्र बाळासाहेबांनी हा धोरणात्मक निर्णय घेतला होता. इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी जाहीर केली तेव्हाही बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना भवनावर हल्ला झाला होता. त्यानंतर 1979 मध्ये काँग्रेसने शिवसेनेकडे पाठिंबा मागितला होता. त्याची परतफेड म्हणून काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे तीन आमदार विधानसभेत गेले होते. अशा प्रकारे बाळासाहेबांनी विखारी लाटेत राजकीय चातुर्य दाखवत संघटना पुढे नेली. असे या व्हिडिओत म्हटले आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरेही आगामी काळात वाटचाल करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे