बालगोविंदांचा थरार कायम
By Admin | Updated: August 19, 2014 00:03 IST2014-08-19T00:03:56+5:302014-08-19T00:03:56+5:30
‘बोल बजरंग बली की जय’ च्या घोषणा देत, उच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देत बालगोविंदांनी दहीहंडीमध्ये आपला दरारा कायम ठेवला.

बालगोविंदांचा थरार कायम
नवी मुंबई : ‘बोल बजरंग बली की जय’ च्या घोषणा देत, उच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देत बालगोविंदांनी दहीहंडीमध्ये आपला दरारा कायम ठेवला. दहीहंडी फोडण्यासाठी बहुतांशी ठिकाणी बारा वर्षाखालील मुलांचा सहभाग दिसून आला.
शहरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात उभारलेल्या हंडय़ा फोडण्यासाठी गोविंदा पथकांची थरारक थर रचण्याची चाललेली लगबग पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. गोविंदा पथकांमध्ये बारा वर्षाखालील मुलांच्या सहभागावर बंदी कायम असतानाही अनेक पथकांमध्ये लहान मुलांचा सहभाग दिसून आला. बोल बजरंग बली की जय अशा घोषणा देत हे बालगोविंदा हंडी फोडण्यासाठी सरसावत होते. त्यानुसार रचले जाणारे थरारक मनोरे पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. कोपरखैरणो तीन टाकी येथे यंदा प्रथमच सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उभारण्यात आली होती. या ठिकाणी उभारलेली हंडी फोडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गोविंदा पथकांची चुरस लागली होती. त्यानुसार आमदार संदीप नाईक यांनी या ठिकाणी उपस्थित राहून गोविंदा पथकांना प्रोत्साहित केले. घणसोली येथे प्रशांत पाटील मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणो यंदाही मोठय़ा उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. शिक्षण मंडळ सदस्य प्रशांत पाटील यांच्या वतीने आयोजित ही हंडी फोडण्यासाठी नवी मुंबईसह ठिकठिकाणच्या गोविंदा पथकांचे थरारक मानवी मनोरे रचले जात होते. शिरवणो येथील कै. विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नगरसेविका माधुरी सुतार व राष्ट्रवादीचे विभाग अध्यक्ष जयेंद्र सुतार यांच्या माध्यमातून ही हंडी उभारण्यात आली होती. त्यानुसार या ठिकाणी गोविंद पथकांच्या मानवी मनो:यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद देखील उपस्थितांनी घेतला. (प्रतिनिधी)
91 ठिकाणी फुटल्या हंडय़ा
शहरात एकूण 91 ठिकाणी हंडय़ा उभारण्यात आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष खबरदारी म्हणून राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली होती. उत्सवाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली होती. शहरात कोठेही वाहतूक कोंडी होवू नये यासाठी अनेक ठिकाणी मार्गात बदल करण्यात आले होते. तर पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांच्यासह गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी विविध ठिकाणच्या दहीहंडी उत्सवाला भेट देवून सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी केली.
पाच गोविंदा जखमी
शहराच्या विविध भागात दहीहंडी फोडताना पाच गोविंदा जखमी झाले आहेत.तीन बाल गोविंदा असून ते सर्व ऐरोली येथील रहणारे आहेत. तर उर्वरित दोघे मुंबई येथील आहेत. जखमी झालेल्या बाल गोविंदात शिवम सौदाणो (8), अदिनाथ भालेराव (11) व मंगल सिंग (8) यांचा समावेश आहे. तर मुंबई येथून दहीहंडी फोडण्यासाठी नवी मुंबईत आलेले सागर इंगळे (19) व अनिल इल्ले (36 ) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महापालिकेच्या वाशी येथील रूग्णालयात दाखल केले आहे.
पनवेलमध्ये लाख मोलाच्या हंडय़ा
पनवेल : गोविंदा आला रे आला.. या गीतावर थिरकत गोविंदा पथकाने पनवेल परिसरातील लाख मोलाच्या दहीहंडय़ा फोडल्या. थरांचा थरार पाहण्यासाठी पनवेलकरांनी ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती
मुंबई, ठाण्याप्रमाणो पनवेलमध्येही गोपालकाला उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेल शहरात बापटवाडा आणि लाईन आळीमध्ये पारंपरिक पध्दतीने दहिकाला उत्सव पार पडला. या दोनही दहीहंडय़ांना ऐतिहासिक, धार्मिक परंपरा आहे. या व्यतिरिक्त नवीन पनवेलमध्ये नगरसेवक संतोष शेट्टी यांची श्री रामश्री दहीहंडी, नामदेव फडके यांच्या क्रांतिकारी सेवा मंडळाची क्रांतिसेवा दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी थरार अनुभवायला मिळाला. (वार्ताहर)