शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल, विहिंपची मोहीम, ‘बाबरी’ पुनरावृत्तीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 06:31 IST

कारसेवा करून कबर हटवण्याचा इशारा; उद्या राज्यभर आंदोलन, खुलताबाद येथील कबर परिसरात चोख बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर/पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा, अशी मोहीम विहिंप, बजरंग दलाने शिवजयंतीला हाती घेतली आहे. औरंगजेबाची कबर न हटवल्यास ‘बाबरी’ची पुनरावृत्ती करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, खुलताबाद येथील कबर परिसरात पोलिस फौजफाटा मोठ्या प्रमाणात वाढवून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे यांनी पुण्यात संयुक्त पत्रपरिषदेत सांगितले, की औरंगजेबाची कबर गुलामगिरी, लाचारी व अत्याचारांची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी; अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरत आंदोलन करेल, मोर्चे काढेल व आवश्यकता भासल्यास चक्काजाम व कारसेवा करून ती कबर उद्ध्वस्त करेल.  

उद्या राज्यभरात आंदोलनकबर हटवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे. तिथीप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सोमवारी स. ११:३० वाजता पुण्यासह राज्यातील तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले जाईल, अशी माहिती विहिंपने दिली.

तर कारसेवेसाठी कूच करू - बजरंग दलाचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेऊन औरंगजेबाची कबर शासनाने खणून काढावी, आलमगीर हे नाव कोठेही असू नये, अन्यथा बजरंग दलाचे लाखो कार्यकर्ते संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कूच करतील, असा इशारा त्यांनी दिला.

पोलिसांबरोबरच पुरातत्त्व विभागाचेही कर्मचारी तैनात -विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी औरंगजेब कबर परिसराची पाहणी करून बंदोबस्त तैनात केला आहे. मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. औरंगजेबाची ही कबर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने पोलिसांबरोबरच पुरातत्त्व विभागानेही कर्मचारी तैनात केले आहे. एसआरपीएफचे ११५ शस्त्रधारी जवान, दंगल नियंत्रण पथकाच्या २५ पोलिस जवानांसह ६० पोलिस अंमलदार नियुक्त केले आहेत. कबर परिसरात जाताना २ ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली आहे. कबरीकडे जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी केली जात आहे.

संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेशबंदीचे आदेश जारी झाले आहेत.

औरंगजेबाजवळ पैसा, मनुष्यबळ, शस्त्रे अमाप होती. इथे २७ वर्षे राहूनही त्याला राज्य करता आले नाही, हे जगाला दाखवण्यासाठी त्याच्या कबरीला हात लावू नये, असे मला वाटते.आ. रोहित पवार, शरद पवार गट

औरंगजेबाची कबर हटविलीच पाहिजे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. हिंदूंवर अन्याय-अत्याचार करणाऱ्याची कबर हवीच कशाला? ती तत्काळ हटवा.संजय शिरसाट, मंत्री व शिंदेसेनेचे नेते

मराठेशाहीने औरंगजेबाचे मनसुबे उधळून लावले. औरंगजेबासारख्या अत्याचारी मुघलाला इथे कबरीत गाडले गेले, हे आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांना दाखवलेच पाहिजे.खा. अरविंद सावंत, उद्धवसेना.

रावणाला बाजूला करून रामायण सांगता येईल का? अफजल खान बाजूला करून प्रतापगडाची लढाई सांगता येईल का? औरंगजेब कबर हटाव मोहीमेला सरकारचा देखील छुपा पाठिंबा आहे.जितेंद्र आव्हाड, शरद पवार गट

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरKhulatabadखुल्ताबाद