मालेगावात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर हल्ला; वाहनाची तोडफोड

By Admin | Updated: February 14, 2017 13:44 IST2017-02-14T13:29:27+5:302017-02-14T13:44:29+5:30

मालेगाव येथील जुना आग्रा महामार्गावरील नानावटी पेट्रोलपंपासमोर एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांच्या टोळक्याने हल्ला केला.

Bajrang Dal activist attacked Malegaon; Disruption of the vehicle | मालेगावात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर हल्ला; वाहनाची तोडफोड

मालेगावात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर हल्ला; वाहनाची तोडफोड



नाशिक : मालेगाव येथील जुना आग्रा महामार्गावरील नानावटी पेट्रोलपंपासमोर एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांच्या टोळक्याने अचानक येऊन हल्ला केला. या हल्लयात मच्छिंद्र शिणके जखमी झाले असून घटनेनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर रास्ता रोको करत हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिणके हे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रखंड मंत्री असून बजरंग दलाचेही कार्यकर्ते आहेत. शिणके हे टाटा सुमो वाहन घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आले असता सदर हल्ला झाला. हल्लेखोराने घटनास्थळावरून पलायन केले आहे या हल्ल्याच्या घटनेनंतर मालेगावमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी जुना आग्रा महामार्ग परिसरात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Bajrang Dal activist attacked Malegaon; Disruption of the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.