शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

बडोलेंच्या घरातच ‘सामाजिक न्याय’: मंत्र्यांच्या मुलीलाच शिष्यवृत्तीचा लाभ, सचिवाचा मुलगाही बनला लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 4:14 AM

लोकप्रतिनिधी वा अधिकारी आहेत, म्हणून शेतकरी कर्जमाफी नाकारणा-या राज्य सरकारने, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कन्येला आणि त्यांच्याच विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या पुत्रास सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकप्रतिनिधी वा अधिकारी आहेत, म्हणून शेतकरी कर्जमाफी नाकारणा-या राज्य सरकारने, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कन्येला आणि त्यांच्याच विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या पुत्रास सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला आहे.मंत्री बडोले यांची कन्या श्रुती हिने ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठात अ‍ॅस्ट्रॉनॉमी व अ‍ॅस्ट्रोफिजिक्स विषयांत पीएच.डीसाठी प्रवेश घेतला आहे. तर सचिव वाघमारे यांचा पुत्र अंतरिक्ष याने अमेरिकेतील पेनेनसिल्वेनिया विद्यापीठात सायन्स इन इन्फॉर्मेशन सीस्टिम या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. या दोघांनाही सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्ती बहाल केली आहे.गॅसची सबसिडी आपणहून सोडण्याचे आवाहन एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असताना, स्वत: मंत्री व त्याच खात्याच्या सचिवांच्या मुलांना शिष्यवृत्ती कशी दिली जाते? असा सवाल केला जात आहे.राज्यातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची सुरुवात ११ जून २००३ रोजी करण्यात आली होती. त्यात सुरुवातीला पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा होती. ती वाढवित, १६ जून २०१५ रोजी वार्षिक ६ लाख रुपये करण्यात आली, पण हे करताना अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांना जागतिक मानांकनाच्या पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत  असेल तर उत्पन्नाच्या मर्यादेची अट नसेल, असे नमूद करण्यात आले. १०१ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठांसाठी ६ लाखाच्या उत्पन्नाची अट ठेवण्यात आली. बड्या लोकांच्या पाल्यांना या सवलतीचा लाभ मिळावा म्हणूनच उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याचाच फायदा बडोले यांची कन्या, वाघमारेंचा मुलगा आणि इतर काही जणांना झाला, असे दिसते. गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन पंतप्रधान करतात. राज्याचे मुख्यमंत्री सधन शेतकºयांना कर्जमाफी नाकारण्यास सांगतात. मात्र त्यांच्याच सरकारमधील मंत्री, सचिव आपल्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचा गैरफायदा उठवत आहेत. यातून भाजपा सरकारचा दुटप्पीपणा व दांभिकपणा स्पष्ट होतो, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.

गुणवत्तेवरच केली निवड-श्रुती बडोले आणि अंतरिक्ष वाघमारे यांची निवड गुणवत्तेच्या निकषावरच करण्यात आली असल्याचा खुलासा, सामाजिक न्याय विभागाने पाठविला आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड करताना, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने ही निवड केली. स्वत: बडोले आणि वाघमारे या समितीपासून दूर राहिले, असा दावा खुलाशात करण्यात आला आहे.सहसंचालकाच्या मुलासही शिष्यवृत्तीचा प्रसाद-तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक दयानंद मेश्राम यांचा मुलगा समीर यालाही शिष्यवृत्तीचा प्रसाद मिळाला आहे. तो वॉशिंग्टन विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.