बदनापूर पोलीस निरीक्षक एसएमएसप्रकरणी चौकशीचे आदेश
By Admin | Updated: September 8, 2016 05:46 IST2016-09-08T05:46:18+5:302016-09-08T05:46:18+5:30
दनापूरचे आमदार आमदार नारायण कुचे यांच्या दबावाला कंटाळून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी पोलीस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांना मी कुटुंबीयांसह आत्महत्या करायला

बदनापूर पोलीस निरीक्षक एसएमएसप्रकरणी चौकशीचे आदेश
जालना : बदनापूरचे आमदार आमदार नारायण कुचे यांच्या दबावाला कंटाळून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी पोलीस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांना मी कुटुंबीयांसह आत्महत्या करायला जात असल्याचा मेसेज २ सप्टेंबर रोजी पाठविल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी लोकमतने सविस्तर वृत्त शनिवारच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी दिले.
गणेशोत्सवादरम्यान गुलालाची विक्री व्यापाऱ्यांनी करू नये, अशा आशयाच्या नोटिसा पोलीस निरीक्षक काळे यांनी व्यापाऱ्यांना बजावल्या होत्या. व्यापाऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्यानंतर मी याबाबत विचारण्यासाठी काळे यांना फोन केला व भेटण्यास सांगितले. परंतु ते भेटण्यासाठी आले नाहीत.
उलट माझ्या वरिष्ठांना याविषयी बोलण्याचे फोनवर त्यांनी मला सांगितले. त्यानंतर आयजी अजित पाटील, एस.पी ज्योतिप्रिया सिंह आणि अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याशी या नोटिसीविषयी माझे बोलणे झाले. त्याचे गांभीर्य ओळखून माकणीकर हे बदनापूर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसामध्ये दुरूस्ती करून गुलाल विकण्यास मुभा दिली.
त्यामुळे काळे यांना मी शिवीगाळ करण्याचा प्रश्नच येत नाही. काही कामानिमित्त ठाण्याच्या पीआयला बोलावून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते भेटायला येणे टाळत असतील तर राग येणे सहाजिकच आहे. परंतु मी काळे यांना शिवीगाळ केली नसल्याचे आ. नारायण कुचे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)