विरोधाच्या पार्श्वभूमीवर ‘एलिझाबेथ एकादशी’चा शो
By Admin | Updated: November 22, 2014 00:43 IST2014-11-22T00:43:25+5:302014-11-22T00:43:50+5:30
तब्बल सात मराठी चित्रपट असून त्यातील पहिला मराठी चित्रपट ‘एलिझाबेथ एकादशी’ पाहायला रसिकांनी प्रचंड गर्दी केली

विरोधाच्या पार्श्वभूमीवर ‘एलिझाबेथ एकादशी’चा शो
संदीप आडनाईक -पणजी : वारकऱ्यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ‘एलिझाबेथ एकादशी’ या मराठी चित्रपटाचा शो ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शुक्रवारी झाला. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा चित्रपट महोत्सवाचे संचालक शंकर मोहन आणि अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इंडियन पॅनोरामा विभागामध्ये २६ फिचर फिल्म, तर १५ नॉन-फिचर फिल्म्स दाखविण्यात येणार आहेत. या विभागात तब्बल सात मराठी चित्रपट असून त्यातील पहिला मराठी चित्रपट ‘एलिझाबेथ एकादशी’ पाहायला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. बऱ्याच रसिकांना तिकिटे असूनही जागेअभावी हा चित्रपट पाहता आला नाही.