अचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांची घोषणा सापडली वादात
By Admin | Updated: January 14, 2017 19:22 IST2017-01-14T19:20:38+5:302017-01-14T19:22:26+5:30
नाशिक येथील ऍड अनिल हँडग यांनी नाशिक मध्ये जिल्हा आचारसंहिता कक्षकडे तक्रार केली आहे.

अचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांची घोषणा सापडली वादात
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 14 - राज्यात अनेक ठिकाणी विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघासाठी आचार संहिता सुरु असताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षकांना आरोग्य विम्याचे कवच देण्याची घोषणा वादात सापडली आहे.
नाशिक येथील ऍड अनिल हँडग यांनी नाशिक मध्ये जिल्हा आचारसंहिता कक्षकडे तक्रार केली आहे. शासनाच्या विविध निर्णयामुळे शिक्षक वर्ग नाराज आहे. त्यामुळे विम्याची योजना लागू करण्याचे जाहीर करून पदवीधर शिक्षकांना प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अर्थ मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे