युरोपमध्ये हापूसवरील बंदी मागे
By Admin | Updated: January 20, 2015 18:03 IST2015-01-20T17:59:16+5:302015-01-20T18:03:31+5:30
फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणा-या हापूस आंब्यावरील बंदी युरोपीयन महासंघाने मागे घेतली असून बंदी हटल्याने कोकणातील आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

युरोपमध्ये हापूसवरील बंदी मागे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणा-या हापूस आंब्यावरील बंदी युरोपियन महासंघाने मागे घेतली आहे. बंदी हटल्याने कोकणातील आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असून युरोपमधील खवय्यांनाही पुन्हा एकदा हापूसची चव चाखता येणार आहे.
गेल्यावर्षी युरोपियन महासंघाने किटकांमुळे हापूस आंब्यावरील निर्यातीवर बंदी घातली होती. युरोपियन महासंघाने हापूस आंब्यावर तीन विविध शुद्धी प्रक्रिया केल्यावर हापूसला युरोपमध्ये प्रवेश मिळेल असे स्पष्ट केले होते. मात्र केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने हापूस आंब्यावर युरोपमध्ये नो एंट्रीची नामूष्की ओढावली होती.या बंदीचा फटका कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना बसला होता. तर युरोपमध्ये राहणा-या भारतीयांनाही हापूसची चव चाखता आली नव्हती. मात्र आता ही बंदी मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी हापूसला युरोपवारी करणे शक्य होणार आहे.