शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 20:08 IST

वागणूक चुकीची असल्याने भाषा चुकीची वापरली. शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे. त्यांना आत्महत्या करायची वेळ आली आहे असं कडू यांनी म्हटलं.

बुलढाणा - शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना मारा, कापा असं विधान शेतकरी नेते बच्चू कडू यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून आता बच्चू कडू यांनी त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहत आमदाराला कापा बोललो तर राग येतो, मग रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी रोज मरतो त्याचा तुम्हाला राग येत नाही. आम्ही फक्त बोललो तर संताप व्यक्त करता. शेतकऱ्यांना रोज लुटले जाते त्याचा संताप नाही. मते तुम्ही आमची घेणार आणि काळजी घ्यायची आमदाराची...आमदारांना चोपावेच लागेल, चोपल्याशिवाय आंदोलन होणार नाही. ३ हजाराने सोयाबीन विकावे लागते, ६ हजाराने कापूस विकावा लागतो, का कुणी बोलत नाही. पंजाबमध्ये ९५ टक्के शेती माल हमीभावाने खरेदी केला जातो. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचा माल २२००-१५०० ने विकावा लागतो. या लोकांची पूजा करायची का? वेळ आली तर आमदारांना मी चोपणार असं त्यांनी इशारा दिला.

तसेच आम्ही भान ठेवण्यापेक्षा तुम्ही भान ठेवा. वेळ आल्यावर आम्ही काय असेल ते करू. पहिले संजय शिरसाट यांना घेऊ..वागणूक चुकीची असल्याने भाषा चुकीची वापरली. शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे. त्यांना आत्महत्या करायची वेळ आली आहे. संत्रा, सोयाबीन, कापूस गेला देवाभाऊंनी शेतकऱ्यांची काळजी घ्यावी असा सांगत बच्चू कडू यांनी संजय शिरसाट आणि नितेश राणेंचा समाचार घेतला.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

रोज १०-१२ शेतकरी आत्महत्या करतायेत. सरकार ऐकायला तयार नाही. त्यामुळे जर आत्महत्या करायची असेल तर स्वत: मरण्यापेक्षा आमदारांना कापा ना असं विधान बच्चू कडू यांनी बुलढाणा येथील सभेत केले होते. मात्र बच्चू कडू यांचे हे विधान लोकशाहीत योग्य नाही. कापा, चोपा ही भाषा मंत्रि‍पदावर राहिलेल्या व्यक्तीने बोलणे चुकीचे आहे असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं होते. तर एखादे विधान करत असताना आपण काय बोलतोय याचे भान ठेवले पाहिजे. शेतकरी अडचणीत आहे त्याला आता खून करायला लावणार का, सरकारविरोधात काय बोलायचे हा त्यांचा अधिकार आहे. शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करावा त्यापेक्षा तुम्हीच करा ना असा संताप संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bachchu Kadu defends 'cut MLAs' remark amidst farmer suicides.

Web Summary : Bachchu Kadu stands by his controversial statement, questioning outrage over MLAs versus farmer deaths. He advocates aggressive action against representatives neglecting farmers' plight, criticizing low crop prices and demanding government accountability. Kadu also lashed out at Sanjay Shirsat and Nitesh Rane.
टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूSanjay Shirsatसंजय शिरसाटFarmerशेतकरी