शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Bachchu Kadu: ‘...तर त्यांच्या घरासमोर हात कलम करेन’, बच्चू कडूंनी फेटाळून लावले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 21:18 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बच्चू कडूंविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

अकोला: राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu)  यांच्यावर बनावट दस्ताऐवज बनवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी तक्रार दाखल केली होती. पण, बच्चू कडू यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

तक्रार आल्यानंतर भगतसिंह कोश्यारींनी सर्व कागदपत्रांची तपासणी करुन बच्चू कडूंविरोधात खटला चालवण्याचे आदेश शनिवारी दिले. त्याबाबतची माहिती वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली. या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, पुंडकरांवर पलटवारही केला.

काय म्हणाले बच्चू कडू?आज बच्चू कडू अकोला दौऱ्यावर गेले, तिथे त्यांनी ज्या रस्त्यावरुन आरोप करण्यात आला, त्या रस्त्याची पाहणी केली. अकोट तालुक्यातील कुटासा ते कावसा असा हा रस्ता आहे. यावेळी बोलताना बच्चू कडूंनी पुंडकर यांच्यावर टीकाही केली. 'पुंडकरांनी बाळापूर येथील पंचशिल संस्था हडप केली. ते वंचित सोबत राहून दलितांवर अन्याय करतात. मी एक रुपयाही खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर स्वतःचे हात कलम करेन. पुंडकर यांना वेगळ्या चष्म्याची गरज आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडूंवर काय आरोप आहे?शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन बच्चू कडूंनी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करुन घेतल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी राज्यपालांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी