शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

Bacchu Kadu: मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं, पण तोवर डोक्यावरुन पाणी गेलंय- बच्चू कडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 09:16 IST

Bacchu Kadu: शिवसेनेतून एक मोठा गट फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणार मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार आज पहाटेच सूरतहून गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.

Bacchu Kadu: शिवसेनेतून एक मोठा गट फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणार मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार आज पहाटेच सूरतहून गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. सूरतमधील हॉटेलमधून निघण्याआधी बंडखोर आमदारांचा एक ग्रूप फोटो समोर आला आणि यात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार फुटले आहेत. या बंडखोर आमदारांसोबत 'प्रहार'चे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू देखील आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर बच्चू कडू यांनी संपूर्ण घटनाक्रम एबीपी माझा या वृत्तवाहिनीला फोनवरुन सांगितला आहे. यात बच्चू कडू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत फोनवरुन बोलणं झाल्याचं म्हटलं. 

"मी स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांच्याशी बोलणं झालं. मी दोन्ही निवडणुकीला म्हणजेच राज्यसभा आणि विधान परिषदेलाही तुम्हाला मतदान केलं. पण अचानक हे वातावरण तयार झालं आणि मी आज इथं आहे असं त्यांना सांगितलं. एवढा सगळा प्रकार झाल्यामुळे मुख्यमंत्री नाराज होतेच. त्यांनी तुम्ही परत या असं आवाहन केलं. पण तोवर सगळं पाणी डोक्यावरुन गेलं आहे", असं बच्चू कडू म्हणाले. 

सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेतआमदारांना मारहाण करुन डांबून ठेवण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता बच्चू कडू यांनी इथं असं अजिबात काहीच झालेलं नाही असं म्हटलं. "सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे", असं बच्चू कडू म्हणाले. 

समर्थन ५० आमदारांपर्यंत पोहोचेलएकनाथ शिंदे यांच्या गटाला असलेलं समर्थन हे ५० आमदारांपर्यंत पोहोचेल असा दावा देखील बच्चू कडू यांनी केला. गुवाहाटीमध्ये सध्या शिवसेनेचे ३३ आमदार आणि अपक्ष ३ असे ३६ आमदार आहेत. यात शिवसेनेचे आणखी काही आमदार येणार आहेत. तसंच काँग्रेसचेही आमदार संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काळात हे समर्थन ५० आमदारांपर्यंत पोहोचेल, असं बच्चू कडू म्हणाले. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे