बच्चूंचे "कडू" बोल, सचिन तेंडुलकरला कबुतराची उपमा
By Admin | Updated: April 18, 2017 12:13 IST2017-04-18T09:24:26+5:302017-04-18T12:13:02+5:30
अहमदनगरमध्ये आसूड यात्रेत शेतकऱ्यांची व्यथा सांगताना बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरचा उल्लेख कबुतर असा केला आहे

बच्चूंचे "कडू" बोल, सचिन तेंडुलकरला कबुतराची उपमा
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 18 - हेमा मालिनी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता आमदार बच्चू कडू यांची पुन्हा जीभ घसरली आहे. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचं नाव आमदार बच्चू कडूंच्या तोंडी होतं. बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरचा उल्लेख कबुतर असा केला आहे. अहमदनगरमध्ये आसूड यात्रेत शेतकऱ्यांची व्यथा सांगताना बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं. "सचिनचे रन मोजणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत. मात्र शेतात अयुष्यभर ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांचे रन मोजायला कोणीच नसल्याचं", ते बोलले आहेत.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू -
"सचिन तेंडुलकरचे रन नका मोजू, ते कबुतर मेलं काय, राहिलं काय. नको काढू रन साल्या, आपलं काय वाट्याने चाललंय इथे. एवढं डोक्यावर घेतलंय, असं वाटतंय पाकिस्तान जिंकून आलंय. पाहिलं तर इथून छक्का आणि तिथून चौका, ते काय कोणालाही मारता येतं".
काही दिवसांपुर्वी बच्चू कडू यांनी शेतकरी आत्महत्येवर बोलताना हेमा मालिनी यांचं नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, या मुद्यावर प्रतिक्रिया देत असताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी "हेमा मालिनी रोज बंपर दारू पितात, पण अजून आत्महत्या नाही केली", असं वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर मात्र त्य़ांनी सारवासावर करण्याचा प्रयत्न करतात त्या चित्रपटाच जास्त दारु पितात म्हणून तसं म्हटलं असल्याचं सांगितलं.