बाबासाहेबांचे लंडनमधील घर शासन घेणार विकत!

By Admin | Updated: January 25, 2015 02:28 IST2015-01-25T02:28:17+5:302015-01-25T02:28:17+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमधील ज्या घरात १९२१-२२ मध्ये वास्तव्यास होते, ते घर विकत घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Babasaheb's London home to buy the government! | बाबासाहेबांचे लंडनमधील घर शासन घेणार विकत!

बाबासाहेबांचे लंडनमधील घर शासन घेणार विकत!

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमधील ज्या घरात १९२१-२२ मध्ये वास्तव्यास होते, ते घर विकत घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
जागतिक शिक्षण परिषदेच्या निमित्ताने सध्या लंडनमध्ये असलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यासाठी गाठीभेटी घेऊन हा निर्णय जाहीर केला. लंडनमधील हे घर घरमालकाने विक्रीस काढले होते.
भारत अथवा महाराष्ट्र सरकारने ते विकत घ्यावे, यासाठी बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास यांनी सतत पाठपुरावा केला. लंडन दौऱ्यावर असलेले तावडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. या घराची विक्री ३५ कोटी रुपयांत होत असल्याचे समजल्यानंतर तावडे यांनी सध्या स्वित्झर्लंडमध्ये असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि हे घर राज्य सरकारने विकत घेण्यास मुख्यमंत्र्यांनी लगेच संमती दिली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर तावडे यांनी बुद्धिस्ट फोरम आणि लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाचे अधिकारी यांच्यासमवेत बाबासाहेबांच्या त्या घराला भेट दिली. त्यानंतर इंडिया हाऊसमध्ये ब्रिटिश उच्चायुक्त रंजन मथाई, बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास आणि अन्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. खरेदीसंबंधी आवश्यक प्रक्रिया व कायदेशीर बाबी तपासून दोन महिन्यांत घर खरेदी करण्याचे बैठकीत ठरले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Babasaheb's London home to buy the government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.