शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Babanrao Lonikar: बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ, शिवीगाळ प्रकरणात ऊर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 21:33 IST

Babanrao Lonikar: नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

मुंबई: नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. शिवीगाळसोबतच आमदार लोणीकर यांनी अभियंत्यास आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

उर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेशमाजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 'या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत. ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल,' असे राऊत म्हणाले.

भाजपला लगावला टोला'आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या ऑडिओ क्लिपच्या बातम्यांची मी दखल घेतली आहे. अभियंत्यांसोबत केलेला संवाद हा धक्कादायक आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद भुषविलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. स्वतःला संस्कारी म्हणवणा-या एका पक्षाचे 30 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचाही बुरखा या निमित्ताने फाटला आहे,' असा टोलाही राऊत यांनी लगावला.

'तो मी नव्हेच, माझ्या विरुद्ध षडयंत्र'वीज वितरण कंपनीच्या आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. माझे कुठलेही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेले नाही. त्यामुळे मी फोन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरNitin Rautनितीन राऊत