मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापास सक्तमजुरी

By Admin | Updated: September 3, 2016 19:48 IST2016-09-03T19:48:23+5:302016-09-03T19:48:23+5:30

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या आमलाण येथील नराधाम बापाला येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली

Baba Shaktamajuri who raped the girl | मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापास सक्तमजुरी

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापास सक्तमजुरी

>- ऑनलाइन लोकमत
नंदुरबार न्यायालयाचा निकाल : मुलीचा गर्भपातही केला
नंदुरबार, दि. 3 - अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या आमलाण येथील नराधाम बापाला येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. 
या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, आमलाण येथील सामजी इसऱ्या गावीत याने आपल्याच अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून मुलगी गर्भवती राहिली. गर्भपात करण्यास भाग पाडले. वेळोवेळी होणा-या अत्याचारास कंटाळुन पिडीत मुलगी तिच्या मावशीकडे राहायला गेली होती. 
पिडीत मुलीचा ताबा कसा मिळेल व तिचा उपभोग घेण्यासाठी आरोपी नेहमी तिला पळवून घेऊन जाण्याच्या संधी शोधत राहायचा. २० मार्च २०१४ रोजी आरोपी पित्याने मुलगी हरविल्याची तक्रार नवापुर पोलीसात दाखल केली होती. 
बरेच खटाटोप करूनही मुलगी आपल्या हातात येत नसल्याचे बघुन आरोपीने खंडपिठात देखील मुलीस आपल्या ताब्यात देण्यात यावी अशी याचिका दाखल केली होती. त्यावेळी मुलीने आरोपीकडे जाण्यास नकार दिला. पोलीसांनी पिडीत मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला धुळे येथिल बालकल्याण समितीकडे सोपविले. मुलगी सज्ञान झाल्यानंतर तीला तिच्या मावशीच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पिडीत मुलीने नवापुर पोलीसांत ९ डिसेंबर २०१४ रोजी फिर्याद दाखल केली होती.
पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायालयात प्रा. ईश्वर धामणे, मिनाबाई दिवानजी गावीत, डॉ. शिला बोकारे, पोलीस उपनिरीक्षक वराडे, डॉ. निलेश देवराज आणि तपासाधिकारी गढरी यांच्या महत्वपुर्ण साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या. साक्षी, पुरावे लक्षात घेत आरोपी सामजी इस-या गावीत यास न्यायाधिश नितीन बोरकर यांनी १० वर्षे सश्रम कारावास आणि दंड ठोठावला आहे. सरकारपक्षाच्या वतीने अ‍ॅड. निलेश देसाई यांनी काम पाहिले.
 

Web Title: Baba Shaktamajuri who raped the girl