शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“... तर क्षमा मागतो,” महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:06 IST

योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाण्यात आयोजित योग शिबिरात महिलांच्या कपड्यांवरून वादग्रस्त विधान केलं होतं.

योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाण्यात आयोजित योग शिबिरात महिलांच्या कपड्यांवरून वादग्रस्त विधान केलं. यानंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली होती. अनेक स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला होता. आता यानंतर बाबा रामदेव यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानंतर महिला आयोगाकडूनही त्यांना नोटिस पाठवण्यात आली होती. तसंच त्यांना दोन दिवसांमध्ये यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर कर यांनी बाबा रामदेव यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचं पत्र ट्वीट केलं आहे. “बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती ,याबाबतीत त्यांचा खुलासा आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे,” असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

काय म्हणालेत बाबा रामदेव?"महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी मी नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे. केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रमांतर्गत विविध धोरणांना मी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. यावरून हे स्पष्ट आहे की माझा महिलांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि सोशल मीडियावर आलेली क्लिप संदर्भाबाहेरील आहे,” असं बाबा रामदेव यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलेय.

“कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. माझ्या वक्तव्यामुळे ज्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची मी बिनशर्त माफी मागतो,” असंही त्यांनी नमूद केलंय.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाRupali Chakankarरुपाली चाकणकर