शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Azaan Loudspeaker Issue : महाराष्ट्र सरकारचंही ठरलं...; अजानसंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:02 IST

खरे तर, कर्नाटकात हिंदू संघटनांनी मशिदींवरील लाउडस्पीकर काढण्याची मागणी केली होती. यानंतर सरकारनेही त्यांच्या या मागणीचे समर्थन केले होते.

कर्नाटकातील मशिदींमधील लाउडस्पीकरचा आवाज मोजण्यासाठी मशीन लावण्यावरून जबरदस्त राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्रातही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाउडस्पीकर काढण्याची मागणी केली आहे. तसेच, हे लाउडस्पीकर काढण्यात आले नाही, तर हिंदू मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा म्हणतील, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीही एक नोटीस जारी केली आहे. यात, आजानच्या वेळी लाउडस्पीकरच्या आवाजाचा स्तर किती डेसिबल असावा, हे सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मशिदींमध्ये लागणार आवाज मोजण्याचं मशीन - खरे तर, कर्नाटकात हिंदू संघटनांनी मशिदींवरील लाउडस्पीकर काढण्याची मागणी केली होती. यानंतर सरकारनेही त्यांच्या या मागणीचे समर्थन केले होते. मात्र, याच बरोबर कायद्यानुसार कार्यवाही होईल, असेही सरकारने म्हटले होते. यानंतर कर्नाटक सरकारने सर्वच मशिदींना नोटीस बजावली आहे. यानंतर आता कर्नाटकात आवाज मोजणारे मशीन लावण्याची तयारीही सुरू झाली आहे. 

पोलिसांनीही पाठवली नोटीस -कर्नाटक पोलिसांनीही यासंदर्भात मशिदींना नोटीस बजावली आहे. यात लाउडस्पीकरचा आवाज परवानगी असलेल्या डेसिबलच्या आत असावा, असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकट्या बेंगळुरूतील जवळपास 250 मशिदींना अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व मशिदींच्या लाउडस्पीकरचा आवाज नियमांपेक्षा मोठा असल्याचे आढळून आले होते. यानंतर आता अधिकाऱ्यांनी मशिदींमध्ये असे उपकरण लावायला सुरुवात केली आहे, जे आवाज परवानगी असलेल्या पातळीपर्यंतच ठेवतील. 

तसेच, महाराषट्रातही राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त 2 एप्रीलला मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मशिदींवरील लाउडस्पीकर काढण्यासंदर्भात भाष्य केले होते.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMNSमनसेKarnatakकर्नाटक